यंग इंडियाचा हरारेमध्ये कल्ला ! मालिका ४-१ ने जिंकली

हरारे : वृत्तसंस्था 

पहिल्या समन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर भारताच्या यंग ब्रिगेडने झिंबाब्वे संघाला नंतरच्या चारही समन्यात चारीमुंड्या चित करीत ५ टी २० सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय नोंदविला. रवीवारी झालेल्या शेवटच्या समन्यात भारतीय संघाने झिंबाब्वेला ४२ धावांनी पराभूत केले. या शेवटच्या समन्यात २६ धावा आणि दोन बळी घेणारा शिवम दुबे सामन्याचा मानकरी ठरला, तर वॉशिंग्टन सुंदर मालिकेचा मानकरी ठरला.

अखेरच्या आणि औपचारिक राहिलेल्या या समन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मागील काही समन्यात यशस्वी ठरलेली आघाडीची फळी या समन्यात मात्र फारशी चमक दाखवू शकलीनाही. मात्र आघाडीची फळी कोलमडल्यावर संजू सॅमसन(५८), रियन पराग(२२) आणि शिवम दुबे (२६) यांनी भारतीय संघाची धावसंख्या दिडशेपार पोहोचवली.

१६८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या झिंबाब्वे संघाचा मुकेश कुमारच्या वेगवान माऱ्याचा मुकाबला करता आला नाही आणि त्यांचा संघ १८.३ षटकांत १२५ धावांवर तंबूत परतला. पहिल्या षटकापासूनच मुकेश कुमारने झिंबाब्वे फलंदाजांना जखडून ठेवले. त्याच्या तिखट माऱ्यापुढे झिंबाब्वेचा निम्मा संघ ८७ धावांमध्ये तंबूत परतला. डायन मायर्स (३४), मारूमनी (२७) आणि फरझ अक्रम (२७) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा पर्यटन केला; मात्र त्यांचे बाकीचे सहकारी स्वस्तात बाद झाल्याने भारताने हा सामना आरामात जिंकला.

पहिल्याच चेंडूवर विश्वविक्रम 

या समन्यात सिकंदर रझाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वलने षटकार खेचला. हा चेंडू पंचांनी नोबॉल ठरवला  त्यामुळे या चेंडूवर त्याला सात धावा मिळाल्या. दुसरा चेंडू फ्री हीट असल्याने त्या चेंडूवरही यशस्वीने षटकार खेचला तेव्हा भारताची धावसंख्या झाली १ चेंडू १३ धावा!

धावफलक

भारत : यशस्वी जैस्वल तर. गो. सिकंदर रझा १२, शुभमन गिल झे. सिकंदर गो. एनगरवा १३, अभिषेक शर्मा झे. मदांडे गो. मुझरबानी १४, संजू सॅमसन झे. मरूमनी गो. मुझरबानी ५८, रियन पराग झे. एनगरवा गो. मवूता २२, शिवम दुबे धावबाद २६, रिंकू सिंग नाबाद ११, वॉशिंग्टन सुंदर नाबाद १, अवांतर १०, एकूण ६ बाद १६७.

See also  जोकोविचने सुवर्ण पदक जिंकले! विंबल्डनमधील पराभवाची परतफेड!

गाडी बाद होण्याचा क्रम : १/१३, २/३८, ३/४०, ४/१०५, ५/१३५, ६/१५३.

गोलंदाजी : रझा ४-०-३७-१, एनगरवा ४-०-२९-१, फराझ अक्रम ४-०-३९-०, मुझरबानी ४-०-१९-२, मवूता ४-०-३९-१.

झिंबाब्वे : मधेवेरे तरी. गो. मुकेश ०, मरूमनी पायचीत गो. सुंदर २७, बेनेट झे. दुबे गो. मुकेश १०, मायर्स झे. अभिषेक गो. दुबे ३४, सिकंदर रझा धावबंद ८, कॅम्पबेल झे. तुषार गो. दुबे ४, मदांडे झे. सॅमसन गो. अभिषेक १, अक्रम झे. सॅमसन गो. मुकेश २७, मवूता झे. व गो. मुकेश ४, मुझरबानी नाबाद १, एनगरवा तर. गो. मुकेश ०, अवांतर ९. एकूण १८.३ षटकांत सर्वबाद १२५ धावा.

गाडी बाद होण्याचा क्रम : १/१, २/१५, ३/५९, ४/८५, ५/८७, ६/९०, ७/९४, ८/१२०, ९/१२३, १०/१२५.

गोलंदाजी : मुकेश कुमार ३.३-०-२२-४, तुषार देशपांडे ३-०-२५-१, रवी बिश्नोई ३-०-२३-०, वॉशिंग्टन सुंदर २-०-७-१, अभिषेक शर्मा ३-०-२०-१, शिवम दुबे ४-०-२५-२.