Paris Olympics Archery | भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीलाही उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत परभवाच सामना करावा लागल्याने भारताच्या तिरंदाजीमधील पदकांच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत. चुरशीच्या लढतीत तिला कोरियाच्या नाम सुहेयोन हिने ६-४ आशा फरकाने पराभूत केले.
जोरदार सुरुवात; मात्र! Paris Olympics Archery |
उपांत्यपूर्व फेरीच्या संन्याला शानदार सुरुवात करताना दीपिका कुमारीने पहिलं सेट २८-२६ असा जिंकत २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये नाम सूहीयोन हिने जोरदार पुनरागमन करताना २८-२५ असा सेट जिंकत २-२ अशी बरोबरी साधली. तिसरा सेट पुन्हा २९-२८ असा जिंकत दीपिकाने ४-२ अशी आघाडी घेतली मात्र चौथ्या सेटमध्ये २९-२७ आशा गुणांसह सूहीयोन हिने पुन्हा एकदा ४-४ अशी बरोबरी साधली.
मानूचे आणखी एक कांस्य थोडक्यात हुकले!
अखेर पर्यंत आपल्या पूर्ण ताकदीनिशी लढत देणाऱ्या शेवटच्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र नाशिबाची साथ मिळाली नाही. हा सेट टीने २७-२९ असा गमावला आणि उपांत्यपूर्व फेरीचा सामना ६-४ असा गमवावा लागला. या परभवामुळे दीपिकाचे ऑलिंपिक पदक पटकविण्याचे स्वप्न पुन्हा पूर्ण होऊ शकले नाही.
हेही वाचा
खेळाडूंसाठी आहार अत्यंत महत्त्वाचा