झिंबाब्वेला दहा गडी राखून चिरडले; मालिका खिशात!

हरारे : वृत्तसंस्था 

झिंबाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारताच्या युवा ब्रिगेडने विश्व विजेत्याच्या रुबाबत काउठ सामना १० गडी राखून जिंकला आणि पाच सामन्यांच्या या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. या विजयाचे शिल्पकार ठरली टी भारताची आघाडीची जोडी शुभमन आणि यशस्वी. या दोघांनी नाबाद रहात झिंबाब्वेच्या १५२ धावांचा पल्ला रुबाबात पर केला.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्य भारतीय चमूने झिंबाब्वे संघाला १५२ धावांवर रोखले. झिंबाब्वेच्या माधेवेरे आणि मारूमनी यांनी संघाला चांगली सुरुवात करून देताना ६३ धावांची सलामी दिली. या दोघांच्या जबाबदार खेळीमुळे झिंबाब्वे संघ चांगली धावसंख्या गाठणार असे वाटत असतानाच शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा या बदली गोलंदाजांनी ही सलामीची जोडी तंबूत पाठवली. या दोघांनी टिच्चून केलेल्या गोलंदाजीमुळे झिंबाब्वे संघाला धावांचा वेग वाढविणे कठीण गेले. झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नंतर ३ षटकार आणि २ चौकार मारून ४६ धावांची खेळी करीत धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र या समन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तुषार देशपांडेने त्याला शुभमनच्या हाती जेल देण्यास भाग पडत भारतासमोरचा मोठा अडसर दूर केला.

१५३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने टिच्चून फलंदाजी करताना झिंबाब्वे संघाला कसलीही संधि दिली नाही. यशस्विने ५३ चेंडूत नाबाद ९३, तर शुभमनने ३९ चेंडूत नाबाद ५८ धावा कुटत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिल. यशस्वी सामन्याचा मानकरी ठरला.

धावफलक : झिंबाब्वे

वेस्ली माधेवेर झे. रिंकू गो. शिवं डुबे २५, मारूमनी झे. रिंकू. गो. अभिषेक ३२, ब्रायन बेनेट झे. जैस्वल गो. सुंदर ९, सिकंदर रझा झे. गिल गो. देशपांडे ४६, जोनाथन कॅम्पबेल धावबाद ३, डियोन मेयर्स झे. व गो. खलील १२, क्लाईव्ह मादांडे झे. रिंकू गो. खलील ७, फराज अक्रम नाबाद ४, अवांतर १४, एकूण ७ बाद १५२.

See also  हॉकी : भारताची विजयी सलामी

बाद होण्याचा क्रम : १/६३, २/६७, ३/९२, ४/९६,  ५/१४१, ६/१४७, ७/१५२

गोलंदाजी : खालील ४-०-३२-२, तुषार देशपांडे ३-०-३०-१, रवी बिश्नोई ४-०-२२-०, वॉशिंग्टन सुंदर ४-०-३२-१, अभिषेक शर्मा ३-०-२०-१, शिवं दुबे २-०-११-१.

भारत : यशस्वी जैस्वल नाबाद ९३, शुभमन गिल नाबाद ५८, अवांतर ५, एकूण १५.२ षटकांत बिनबाद १५६.

गोलंदाजी : नागारवा ३-०-२७-०, मुझरबानी ३.२-०-२५-०, चतारा २-०-२३-०, फराज अक्रम ४-०-४१-०, सिकंदर रझा २-०-२४-०, बेनेट १-०-१६-०.