दुसऱ्या ‘वन डे’मध्ये भारताचा पराभव!

Shrilanka India cricket |

Shrilanka India cricket |
Shrilanka India cricket |

Shrilanka India cricket | श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सलग दुसऱ्या वनडे समन्यात भारतीय फलंदाजांची फिरकी घेत त्यांची दांडी उडवली. कागदावर प्रचंड तंगडी समजली जाणारी भारताची फलंदाजी श्रीलंकेच्या फिरकी माऱ्यापुढे अक्षरश: कोसळली. जेफ्री व्हान्डर्से ने ६ भारतीय फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवल्याने बिनबाद ९७ अशी दमदार सुरुवात करूनही भारताचा डाव २०८ धावांवर गडगाडला आणि २४० धावा करणाऱ्या श्रीलंकेने सामना ३२ धावांनी जिंकला.

जोकोविचने सुवर्ण पदक जिंकले! विंबल्डनमधील पराभवाची परतफेड!

मधल्या फळीने डाव सावरला Shrilanka India cricket |

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या डावयाची सुरुवात चांगली झाली नाही. धाव फलकावर एकही धाव नसताना निसांका बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेल्याने त्यांची अवस्था ६ बाद १३६ अशी झाली होती. त्यानंतर वेल्लालागे आणि के. मेंडिस यांनी डाव सावरत श्रीलंकेला २४० धावांचा पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदरने ३ तर कुलदीप यादवने २ बळी घेतले.

जेफ्री व्हान्डर्सेची करामत Shrilanka India cricket |

विजयासाठी आवश्यक २४१ धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने जोरदार सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी त्यांनी ९७ धावांची भागीदारी केली.  शुभमन गिल ३५ धावांवर असताना जेफ्री व्हान्डर्सेने त्याला बाद केले आणि भारतीय फलंदाजीचा डोलारा कोसळण्यास सुरुवात झाली.

कोहली, दुबे, श्रेयस, के. एल. राहुल एका पाठोपाठ बाद झाले. बिनबाद ९७ असलेला भारताचा डाव बघता बघता ६ बाद १४७ असा कोसळला. खालच्या फळीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते संघाची धावसंख्या २०८ पर्यंतच नेऊ शकले.

कॅरोलीना मरीनची दुखापतीमुळे ‘सेमी’तून दुर्दैवी माघार!

३३ धावांत ६ बळी घेणारा जेफ्री व्हान्डर्से सामन्याचा मानकरी ठरला. ३ एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना टाय झाला असल्याने श्रीलंका संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. ते आता मालिका गामावण्याची शक्यता नाही.

See also  हॉकी : भारताला आणखी एक कांस्यपदक!

धावफलक : श्रीलंका : पथूम निसांका झे. के. एल. राहुल. गो. सिराज १, अविष्का फर्नांडो झे. व गो. वॉशिंग्टन सुंदर ४०, कुसल मेंडिस पायचीत गो. वॉशिंग्टन सुंदर ३०, सदिरा समरविक्रमा झे. कोहली, गो. अक्षर पटेल १४, चारिथ असलंका झे. अक्षर पटेल गो. वॉशिंग्टन सुंदर २५, जनिथ लियानागे झे. व गो. कुलदीप १२, दुनिथ वेल्लालागे झे. शिवम दुबे. गो. कुलदीप यादव ३९, कमिंदू मेंडिस धावबाद ४०, अकीला धनंजया धावबाद १५, जेफ्री वांडर्से नाबाद १, अवांतर २४, एकूण ९ बाद २४०.

गडी बाद होण्याचा क्रम : १/०, २/७४, ३/७९, ४/१११, ५/१३६, ६/१३६ ७/२०८, ८/२३९, ९/२४०. गोलंदाजी : सिराज ८-०-४३-१, अर्शदीप ९-०-५८-०, अक्षर पटेल ९-०-३८-१, शिवम दुबे २-०-१०-०, वॉशिंग्टन सुंदर १०-१-३०-३, कुलदीप यादव १०-१-३३-२ रोहित शर्मा २-०-११-०.

लक्ष्य सेन उपांत्य फेरीत पराभूत; ‘कांस्य’ साठी लढणार!

भारत : रोहित शर्मा झे. पथूम निसांका गो. जेफ्री व्हान्डर्से 64, शुभमन गिल झे. के. मेंडिस गो. जेफ्री व्हान्डर्से ३५, विराट कोहली पायचीत गो. जेफ्री व्हान्डर्से १४, शिवं दुबे आयचीत गो. जेफ्री व्हान्डर्से, अक्षर पटेल झे. व गो. चारिथ असलंका, श्रेयस अय्यर पायचीत गो. जेफ्री व्हान्डर्से, के. एल. राहुल त्रि. गो. जेफ्री व्हान्डर्से ०, वॉशिंग्टन सुंदर पायचीत गो. असलंका १५, कुलदीप यादव नाबाद ७, सिराज पायचीत गो. असलंका ४, अर्शदीप सिंग धावबाद ३, अवांतर १५, एकूण ४२.२ षटकांत सर्वबाद २०८.

गडी बाद होण्याचा क्रम : १/९७, २/११६, ३/११६, ४/१२३, ५/१३३, ६/१४७, ७/१८५, ८/१९०, ९/२०१, १०/२०८ गोलंदाजी : असीथा फर्नांडो ७-०-३१-०, वेल्लालागे ६-०-४१-०, अकीला धनंजया १०-१-५४-०, के. मेंडिस ३-०-१९-०, जेफ्री व्हान्डर्से १०-०-३३-६, असलंका ६.२-२-२०-३.