cricket India-Shrilanka | भारत आणि श्रीलंकेदारम्यान सुरू झालेल्या तीन टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या समन्यात भारताने ४३ धावांनी विजय मिळवीत दमदार सलामी दिली.
गौतम गंभीरची कोच म्हणून ही पहिली मालिका आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत आलेल्या या संघाकडून भारतीय क्रिकेट प्रेमींना बऱ्याच अपेक्षा आहेत. या अपेक्षांना नये देतना भारतीय संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केले. यशस्वी आणि गिल यांनी हे आव्हान स्वीकारत ७४ धावांची वेगवान सलामी दिली. पॉवर प्लेमध्ये झालेली ही सर्वात मोठी खेळी ठरली. याचवेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करीत दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत धाडले. यावेळी भारतीय फलंदाजी अडचणीत येते की काय असे वाटून गेले. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र हाती घेत आक्रमक खेळी केली.
लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत; हरमीतनेही मारली बाजी
सूर्यकुमारने ऋषभ पंतला साथीला घेत वेगवान ७६ धावांची भागीदारी रचली. यात सूर्यकुमारने २३ चेंडूत अर्धशतक नोंदविले. त्याला ऋषभ पंतने ४९ धावा करीत चांगली साथ दिली. भारताने निर्धारित २० षटकांत २१३ धावा केल्या.
श्रीलंकेची दमदार सुरुवात cricket India-Shrilanka |
२१४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी केली. कुशल मेंडीस ४५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कुशल परेराला साथीला घेत निसांकाने धावसंख्या १४० पर्यंत नेली त्यावेळी श्रीलंका भारताच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणार असेच वाटून गेले. मात्र पार्टटाइम गोलंदाज रियन प्रयाग याने संन्याला कलाटणी डली. त्याने ३ बळी मिळवीत भारताला समन्यात परत आणले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी नियंत्रित मार करीत श्रीलंकेचा डाव १७० धावांवर संपुष्टात आणला. ५८ धावा करणारा सूर्यकुमार सामन्याचा मानकरी ठरला.
धावफलक : भारत : यशस्वी जैस्वल यष्टीचीत हसरंगा ४०, शुभमन गिल झे. फरनांडो गो. माधुशंका ३४, सूर्यकुमार यादव पायचीत गो. पथिराना ५८, ऋषभ पंत तरी. गो. पाथीराना ४९, हार्दिक पंड्या तरी. गो. पथिराना९, रियन पराग पायचीत गो. पथिराना ७, रिंकू सिंग तर. गो. फरनांडो ९, अक्षर पटेल नाबाद १०, अर्शदीप सिंग नाबाद १, अवांतर ४, एकूण ७ बाद २१३. गोलंदाजी : माधुशंका ३-०-४५-१, फर्नांडो ४-०-४७-१, तिक्षणा ४-०-४४-०, हसरंगा ४-०-२८-१, कमिंदू मेंडिस १-०-९-०, पथीराना ४-०-४०-४. गडी बाद होण्याचा क्रम १/७४, २/७४, ३/१५०, ४/१७६, ५/१९२, ६/२०१, ७/२०६.
श्रीलंका : पथूम निसंका तरी. गो अक्षर पटेल ७९, कुसल मेंडिस झे. यशस्वी गो. अर्शदीप ४५, कुसल परेरा झे. बिश्नोई गो. अक्षर २०, कमिंदू मेंडिस त्रि. गो. रियान पराग १२, चारिथ असलंका झे. यशस्वी. गो. बिश्नोई ०,दासून शनका धावचीत ०, हसरंगा झे. रियान गो. अर्शदीप २, महेश तिक्षणा त्रि. गो. रियान पराग २, पथिराना झे. अक्षर गो. सिराज ६, फर्नांडो नाबाद ०, माधुशंका त्रि. गो. रियान पराग ०, अवांतर ४, एकूण सर्वबाद १७०. गोलंदाजी : अर्शदीप ३-०-२४-२, सिराज ३-०-२३-१, अक्षर ४-०-३८-२, बिश्नोई ४-०-३७-१, पंड्या ४-०-४१-०, रियन पराग १.२-०-५-३. गडी बाद होण्याचा क्रम १/८४, २/१४०, ३/ १४९, ४/१५८, ५/१६०, ६/१६१, ७/१६३, ८/१७०, ९/१७०, १०/१७०.