Paris Olympics | पॅरिस ऑलिंपिकच्या शर्यतीत बॅडमिंटनमध्ये भारताचे आशास्थान असलेल्या लक्ष्य सेनने आपल्या मोहिमेची धडाक्यात सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीत ग्वाटेमालाच्या केव्हिन कॉर्दोन याला सरळ दोन गेममध्ये नामवित दुसऱ्या फेरीत धडक मारली.
चीनने जिंकले पहिले गोल्ड; भारताची निराशा
कॉर्दोन याच्याविरुद्ध लक्ष्यने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्याने पहिल्या गेममध्ये त्याला डोके वर काढूच दिले नाही. ५-० , नंतर ११-२ आणि १८-५ असा धडाका लावताना त्याने या गेममध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवले. हा गेम त्याने २१-८ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये कॉर्दोनची लढत Paris Olympics |
कॉर्दोन याने दुसऱ्या गेममध्ये मात्र लक्ष्यच्या आक्रमक खेळाचा तोंड काढत त्याला चांगली लढत दिली. पहिल्यांदा ३-१ मग ८-५ अशी आघाडी घेत त्याने लक्षीला चांगलेच झुंजवले. ही आघाडी त्याने १४-८ अशी वाढवली. येथे लक्ष्यला तिसरा गेम खेळावा लागणार की काय अशी शंका वाटेल लागली. मात्र लक्ष्यने आपला सर अनुभव पणाला लावत प्रतिआक्रमण करीत सामन्यावर नियंत्रण मिळविले आणि हा गेम ड्युज पर्यंत खेचत २२-२० असा गेम आणि सामना जिंकला.
टेबल टेनिसमध्येही विजयी सलामी Paris Olympics |
बॅडमिंटन पाठोपाठ भारताच्या हरमीत देसाई याने टेबल टेनिसमध्येही भारताला आणखी एक यश मिळवून देत दुसरी फेरी गाठली. त्याने जॉर्डनच्या झैद आबो यामान याच्यावर ४-० अशी मत करीत दुसऱ्या फेरीत धडक मारली. एकेरीच्या पहिल्या समन्यात हरमीतने यामान याच्यावर ११-७, ११-९, ११-५, ११-५ अशी आगदी सहज मात केली.