महिलांपाठोपाठ पुरुष तिरंदाजी संघाचीही उपांत्यपूर्व फेरीत धडक

धीरज बोम्मादेवराने पटकावले वैयक्तिक चौथे स्थान

Archery |
Archery |

पॅरिस : वृत्तसंस्था तिरंदाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीत महिला संघापाठोपाठ पुरुषांच्या संघानेही थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिलांनी पात्रता फेरीत चौथे तर पुरुषांनी तिसरे स्थान पटकावत ही किमया साधली.

भारतीय चमूत ऑलिंपिक पदार्पण करणाऱ्या अग्र मानांकित धीरज बोम्मादेवरा याने पात्रता फेरीत ६८१ गुणांची कमाई करीत चौथे स्थान पटकावले. भरताच्याच तरुणदीप राय याला मात्र ६६४ गुणांसह १४ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्याला वैतक्तीक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी थेट गाठता आली नाही. प्रवीण जाधव याने मात्र निराश केली. ६५८ गुणांसह तो ३९ व्या स्थानावर फेकला गेला.

भारतीय संघाची कमाई २०१३ गुणांची Archery |

दरम्यान धिरज, राय आणि जाधव यांनी एकत्रित २०१३ गुणांची कमाई करीत सांघिक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. त्यांनी चिनलाही मागे टाकले. चीनला चौथ्या स्थानावर राहून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. उपांत्यपूर्व फेरीत तुर्की विरुद्ध कोलंबिया यांच्यातील विजेत्याबरोबर भारतीय संघाची गाठ पडेल.

लिमचा विश्वविक्रम Archery |

दरम्यान महिलांच्या पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहिलेल्या दक्षिण कोरियाच्या सिहयोन लिम हिने ६९४ गुणांसह विश्वविक्रम नोंदवीत स्पर्धेला शानदार सलामी दिली.

हेही वाचा 

महिला तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत! अंकिताला ११ वे स्थान

सेहवागचे चिमटे अन् सचिनची तंबी!

See also  लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत