लक्ष्य सेनने इतिहास घडवला; उपांत्यफेरीत धडक!

Paris Olympics |

Paris Olympics Badminton |
Paris Olympics Badminton |

Paris Olympics | भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिंपिक मध्ये शुक्रवारी इतिहास घडवला. ऑलिंपिक स्पर्धेच्या पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यफेरी गाठणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांमध्ये पी. व्ही सिंधूने याआधी 2 ऑलिंपिक पदके जिंकली आहेत.

पिछाडी नंतरही सामना फिरवला Paris Olympics |

शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या समन्यात लक्ष्यने अत्यंत लढाऊ बण्याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या चायनीज ताइपेइच्या चोऊ टीएन चेन याचा तीन गेममध्ये पराभव करून हे यश मिळविले. आपले पहिले ऑलिंपिक पदक मिळविण्यासाठी त्याला आणखी केवळ एक पाऊल टाकावे लागणार आहे.

छोटं… पण प्रकृतीसाठी मोठं… पाण्याविषयी बरंच काही!

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंनी एकमेकांची ताकद ओळखून आक्रमक खेळ केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या गेममध्ये चेनने बाजी मारली. त्याने हा गेम २१-१९ असा जिंकत समन्यात आघाडी घेतली. मात्र त्यानंतर लक्ष्य सेनने आपला पूर्ण अनुभव पणाला लावत दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन केले. आक्रमण आणि संयम यांचा सुरेख मेळ साधत त्याने दुसरा गेम २१-१५ असा जिंकत बरोबरी साधली.

तिसऱ्या गेममध्ये एकतर्फी वर्चस्व Paris Olympics |

दुसऱ्या गेममध्ये आत्मविश्वास बाळवलेल्या लक्ष्यने मग मागे वळून पहिले नाही. त्याने तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवीत चेनळा समन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. त्याने तिसरा गेम २१-१२ असा सहज जिंकत उपांत्यफेरीत धडक मारली.

चॅम्पियन बनण्यासाठी हवी जिगर, कठोर परिश्रम
उपांत्यफेरीत लक्ष्य सेनला सिंगपूरच्या लोह किन येऊ हा २०२१ चा विश्व विजेता आणि डेन्मार्कचा ऑलिंपिक चॅम्पियन व्हीक्टर अॅक्सेलसेन यांच्यातील विजेत्याशी लढावे लागणार आहे.

See also  रोनाल्डोच्या पोर्तुगालला फ्रांसने चारली धूळ! यजमान जर्मनीही आऊट!!