Olympic Archery | तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत तगडया दक्षिण कोरियाकडून पराभव पत्कराव्या लागलेल्या अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवरा जोडीला कांस्य पदकानेही थोडक्यात हुलकावणी दिली. अत्यंत जिगरबाज खेळ करणाऱ्या या भारतीय जोडीला कांस्य पदकासाठी झालेल्या समन्यात अमेरिकेच्या संघाकडून २-६ असा पराभव स्वीकारावा लागला
लक्ष्य सेनने इतिहास घडवला; उपांत्यफेरीत धडक!
या स्पर्धेतील प्रतीक समन्यात भारतीय जोडीने सुरुवातीपासूनच चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. मात्र अमेरिकेच्या कॅसे काउफहोल्ड आणि ब्रॅडी एलिसन या जोडीने त्यांच्या पदकांच्या आशेवर पाणी फेरले. कांस्य पदकासाठी झालेल्या समन्यात अमेरिकन जोडीने सुरुवातीलाच ०-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन केले. मात्र अखेरच्या टप्प्यात अमेरिकन जोडीच्या अचुकतेला मत देणे भारतीय जोडीला शक्य झाले नाही.