Paris Olympics Tennis | सर्बीयाच्या नोव्हाक जोकोविचने टेनिस एकेरीचे सुवर्णपदक पटकावले. त्याने स्पेनच्या अल्कारेझचा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करीत आपल्या करियर गोल्डन ग्रँड स्लॅमचे स्वप्नही पूर्ण केले. या विजयाने त्याने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू बनण्याचा मानही पटकावला आहे.
कॅरोलीना मरीनची दुखापतीमुळे ‘सेमी’तून दुर्दैवी माघार!
३७ वर्षीय जोकोविचने रविवारी झालेल्या अंतिम समन्यात त्याचा विंबल्डन मधील प्रतिस्पर्धी कर्लोस अल्कारेझ याला ७-६ (७/३), ७-६ (७/२) असे सलग दोन सेटमध्ये पराभूत केले.
विंबल्डनमधील पराभवाचा वचपा Paris Olympics Tennis |
विम्बल्डनमध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागलेल्या जोकोविचने तरुण अल्कारेझला सुरुवातीपासूनच झुंजवले. पहिल्या सेटमध्ये त्याने गेम पॉइंटही घेतला; मात्र अल्कारेझने हा सेट टायब्रेकरमध्ये नेत जोकोविचला तगडे आव्हान दिले. जोकोविचने टायब्रेकरमध्ये आपला तमाम अनुभव पणाला लावत टायब्रेकर आणि सेट ७-६ (७-३) असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली. हा सेट तब्बल १ तास ३३ मिनिटे चालला.
लक्ष्य सेन उपांत्य फेरीत पराभूत; ‘कांस्य’ साठी लढणार!
दुसऱ्या सेटमध्ये दोघांनीही आपल्या टेनिस कौशल्याला पणाला लावत उत्तम टेनिसचे प्रदर्शन केले. दोघांनीही आपापल्या सर्व्हिस राखतान हा सेट टायब्रेकरपर्यंत नेला. शेवटी आपला तमाम अनुभव पणाला लावत जोकोविचने हा सेट आणि सामना जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
हेही वाचा
हॉकी : भारतीय संघाचा ‘चक दे’; इंग्लंडला नामविले!