Paris Olympics Badminton | ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी बॅडमिंटनचे पहिले वाहिले सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य सेनचे स्वप्न अखेर भंगले. रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत लक्ष्यला विद्यमान ऑलिंपिक विजेता व्हिक्टर एक्सेलसेन याच्याकडून सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
हॉकी : भारतीय संघाचा ‘चक दे’; इंग्लंडला नामविले!
अलमोराचा रहिवासी असलेल्या लक्ष्यने पहिल्या सेटमध्ये 3 गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या सेटमध्येही त्याने 7-0 अशी भक्कम आघाडी घेतली; मात्र गतविजेत्या एक्सेलसेने समन्यात पुनरागमन करताना लक्षयचे आव्हान मोडीत काढून २२-२०, २०-१४ असा सामना जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
सेहवागचे चिमटे अन् सचिनची तंबी!
कांस्य पदकासाठी संधी Paris Olympics Badminton |
उपांत्य फेरीत पराभव झाला असला तरी लक्ष्यला कांस्य पदक मिळविण्याची संधि आहे. कांस्य पदकासाठी त्याला मलेशियाच्या ली झी जिया याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत अद्याप कोणाही भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडूला पदक जिंकता आलेले नाही. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधूने एकदा रौप्य तर एकदा कांस्य पदक पटकावले आहे. सुवर्ण पदक भारतापासून आणखी दूरच आहे.
हेही वाचा
खडतर अर्धशतकी वाटचालीनंतर महिला क्रिकेटला गवसले ग्लॅमर