Paris Olympics | भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ने मंगळवारी इतिहास रचला. १० मि. पिस्तूल मिश्र टीम प्रकारात तिने सरबज्योत सिंग बरोबर कांस्य पदकाला गवसणी घातली आणि एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदकं मिळविणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
१३ पैकी १० परफेक्ट १०! Paris Olympics |
पदकासाठी झालेल्या या समन्यात मनू भाकरने आपल्या १३ पैकी १० शॉट परफेक्ट १० असे मारले. अंतिम समन्यात आतापर्यंत कोणीही अशी कामगिरी करू शकलेला नाही. सामन्याच्या सुरुवातीला कोरियन जोडीने किरकोळ आघाडी घेतली खरी; मात्र भारतीय जोडीने जोरदार प्रतीतत्र देत ८-२ अशी दमदार आघाडी घेतली.
मनू भाकर आणि सारबज्योत सिंग यांनी कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीमध्ये तगडया दक्षिण कोरियाला १६-१० आशा फरकाने नमवून कांस्य पदक पटकावले. या पदकमुळे भारताला मिळालेल्या पदकांची संख्या दोन झाली आहे.
कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोन या जोडीला पराभूत करताना भारतीय जोडीने सुरुवातीपासूनच पूर्ण १० गुणांचे लक्ष्य साधण्यावर भर दिला आणि तो साधलाही. कोरियन जोडीने सुरुवातीला मनू आणि सारबज्योतला लढत देण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघांनीही आत्मविश्वासपूर्ण खेळ करीत पदकावर आपली मोहोर उमटविली.
हेही वाचा
क्रीडा संघटनांमध्ये शिस्त आवश्यक