ऑस्ट्रेलियाच्या एडबन-पिअर्स जोडीला टेनिस दुहेरीचे सुवर्ण

Paris Olympics Tennis |

Paris Olympics Tennis |
Paris Olympics Tennis |

Paris Olympics Tennis | ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एडबन आणि जॉन पिअर्स या जोडीने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतील टेनिस दुहेरीच्या सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटविली.

शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीने अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॅजिसेक आणि राजीव राम या जोडीचा ६-७ (६), ७-६ (७-१), १०-८ असा तीन सेट्समध्ये पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर ही ३६ वर्षीय जोडी दुसऱ्या सेटमध्येही २-४ अशी पिछाडीवर पडली. मात्र त्यानंतर या दोघांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करीत समन्यात पुनरागमन केले आणि हा सेट टायब्रेकर पर्यंत खेचला.

टायब्रेकरवर दुसरा सेट जिंकून बरोबरी साधणाऱ्या ऑस्ट्रेलियन जोडीने मग आपला सारा अनुभव पणाला लावत अमेरिकन जोडीला चांगलेच झुंजविले. तसरा सेट १०-८ असा जिंकत या जोडीने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. पहिला सेट गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियन जोडीने दाखवलेली जिगर सामन्याचे हायलाइट ठरले.

See also  कॅरोलीना मरीनची दुखापतीमुळे 'सेमी'तून दुर्दैवी माघार!