Paris Olympics | भरताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधी हिने आपल्या ऑलिंपिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात केली. पहिल्याच समन्यात तिने मालदीवच्या फातिमा नबहा अब्दुल रझ्झाक हीचा २१-९, २१-६ असा धुव्वा उडवीत दुसऱ्या फेरीत धडक मारली.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून एकेरीतील २ ऑलिंपिक पदके मिळविणारी पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडूचा मान सिंधू कडे जातो. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करणाऱ्या सिंधुने फातिमाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. सिंधूच्या स्मॅशेस आणि क्रॉस कोर्ट व्हॉलिना फातिमा कडे उत्तर नव्हते. अवघ्या अर्ध्या तासात सिंधूने हा सामना जिंकत पुढची फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत सिंधुचा सामना ३१ जुलै रोजी ईस्टोनीयाच्या क्रिस्टीन कूबा हिच्या बरोबर होईल.
प्रीती पवारचा विजयी ठोसा Paris Olympics |
बॅन्टमवेट गटातील आपल्या पहिल्या समन्यात मराठमोळ्या प्रीती पवारने विजयो ठोसा मारत बॉक्सिंग मधील भारताच्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. तिने व्हिएटनामच्या व्हो थी किम अन्हा हीच एकतर्फी समन्यात ५-० असा पराभव केला.
सामन्याच्या सुरुवातीपासून प्रीतीने किमवर जोरदार आक्रमण केले. प्रितीच्या वेगापुढे कीमला मागे हटण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. प्रीती पहिल्या मिनीटापासून पुढे सरसावत ठोसे लगावत होती तर किम संपूर्ण रिंगमध्ये मागे मागे फिरत होती. आपल्या डाव्या आणि उजव्या ठोशांनी प्रीतीने किमला हैराण केले. त्यावेळी किम अनेकवेळा प्रीतील मिठी मारत तिच्या ठोशांपासून स्वत:ला वाचवायचा प्रयत्न करीत होती. मात्र प्रितीच्या आक्रमणपुढे तिचा टिकाव लागू शकला नाही.