कॅरोलीना मरीनची दुखापतीमुळे ‘सेमी’तून दुर्दैवी माघार!

Paris Olympics Badminton |

Paris Olympics Badminton |
Paris Olympics Badminton |

Paris Olympics Badminton | स्पेनची विश्वविजेती आणि रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी चॅम्पियन बॅडमिंटनपटू कॅरोलीना मरीनला पॅरिसमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे सामन्याच्या मध्यतूनच माघार घ्यावी लागली.

लक्ष्य सेन उपांत्य फेरीत पराभूत; ‘कांस्य’ साठी लढणार!

रिओमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर टोकियो ऑलिंपिकसाठीही तिलाच सुवर्णपदकाची दावेदार मानले जात होते; मात्र टोकियो ऑलिंपिक सुरू होण्याच्या एक महिना आंगोदरच तिच्या लिगामेन्ट दुखापतीमुळे ती स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. त्यानंतर तिने पॅरिस ऑलिंपिकवर लक्ष्य केंद्रित करून जोरदार पुनरागमन केले. तिने या स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत उपांत्य फेरीही गाठली; मात्र!

पहिलं सेट जिंकला; दुसऱ्यातही आघाडी! Paris Olympics Badminton |

रविवारी झालेल्या हेंग बबिंगजीयाओ हिच्या विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या समन्यातही तिने आपल्या जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करीत आपणच सुवर्णपदकाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले. पहिला गेम तिने २१-१४ असा सहजपणे जिंकलाही. दुसऱ्या गेममध्ये तिने १०-६ अशी आघाडी घेतली आणि टी आता अंतिम फेरीत धडक मारणार असे स्पष्ट दिसत असतानाच तिच्या गुडघ्याला पुन्हा दुखत झाली.

हॉकी : भारतीय संघाचा ‘चक दे’; इंग्लंडला नामविले!

व्हील चेअर नाकारली Paris Olympics Badminton |

काही काळासाठी ती कोर्टच्या बाहेर आली. थोडावेळ उपचार घेतले आणि कोर्टवर परतली; मात्र पुढच्या दोन पॉईंट्समध्ये तिला तिच्या पायांची हालचाल होत नसल्याचे लक्षात आले आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. समन्यात आघाडीवर असतानाही तिला सामना सोडून द्यावा लागल्याने मरीन प्रचंड निराश झाली. ३१ वर्षीय मरीनने जेंव्हा कोर्ट सोडले त्यावेळी तिला व्हील चेअर देण्यात आली. मात्र तिने ही व्हील चेअर नाकारत लंगडत जणेच पसंत केले. यावेळी सामना बघण्यासाठी उपस्थित असलेल्या पॅरिस वासीयांनी तिला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.

गुडघ्याचे ‘एसीएल लिगामेंट’ फटल्यास काय?

झाल्या प्रकराने प्रचंड दु:खी झालेले कॅरोलीनचे प्रशिक्षक फर्नांडो रिव्हास यांनी ‘जे काही झाले त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत’ आशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ऑलिंपिक स्पर्धेत तुम्ही जिंकता किंवा हारता हे कॅरोलीनाला  माहिती आहे. पण आशा प्रकारे..!’ असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

See also  भारतीय महिलांचेही आफ्रिकेवर वर्चस्व! एकमेव कसोटीत १० गडी राखून विजय, फिरकीपटू स्नेह राणा सामनावीर