पॅरिस : वृत्तसंस्था
भारतीय महिलांच्या तिरंदाजी संघाने गुरुवारी झालेल्या पात्रता फेरीत चौथे स्थान पटकावत उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळविले. वैयक्तिक प्रकारात मात्र भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारी चमक दाखवू शकली नाही. पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या नवोदित अंकिता भकत हिने ११ वे स्थान पटकवित दीपिकला मागे टाकले.
२६ वर्षीय अंकिताने ६६६ गुणांसह भारतीय चमूत अव्वल स्थान मिळविले; तर ५५९ गुणांसह भजन कौर २२ व्या स्थानी राहिली. ६५८ गुणांसह दीपिका २३ व्या स्थानी राहीली.
सांघिक प्रकारात भारतीय चमूने १९८३ गुणांसह चौथे स्थान पटकावले. २०४६ गुणांसह दक्षिण कोरियाने पहिले स्थान पटकावले. चीनने दुसरे तर मेक्सिकोने तिसरे स्थान पटकावले.