भारताला पहिले पदक; मनू भाकरने जिंकले कांस्य!

Paris Olympics |

Paris Olympics |
Paris Olympics |

Paris Olympics | नेमबाज मनू भाकरने भारताला पॅरिस ऑलिंपिकमधील पहिले पदक मिळवून दिले. १० मिटर्स एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने कांस्य पदक पटकावले. मनू रौप्य पदकाच्या जवळ पोहोचली होती मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूने तिला केवळ ०.१ गुणाने मागे टाकले.

१२ वर्षानंतर पदक Paris Olympics |

मनू भाकरने अंतिम फेरीत २२१.७ गुण मिळवीत ही कामगिरी केली. नेमबाजीतील हे पदक भारताला तब्बल १२ वर्षानंतर मिळाले आहे. या पूर्वी गगन नारंग आणि विजय यांनी नेमबाजीत ऑलिंपिक पदक पटकावले होते. विशेष म्हणजे नेमबाजीत भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणारी मनू पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे.

पी. व्ही. सिंधूची ऑलिंपिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात; प्रिती पवारही दुसऱ्या फेरीत

सुवर्ण आणि रौप्य दक्षिण कोरियाच्याच खेळाडूंनी पटकावली.  वाय. जे. ओह हिने सुवर्ण तर वाय. जे. किम हिने रौप्य पदक पटकावले. दरम्यान भारताच्या अर्जुन बाबुटा याने १० मिटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असल्याने भारताला नेमबाजीमध्ये आणखी एक पदक मिळण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा 

हॉकी : भारताची विजयी सलामी

सात्विक-चिराग जोडीही दुसऱ्या फेरीत; चीनला दुसरे सुवर्ण

सूर्या चमकला; श्रीलंकेला ४३ धावांनी नामविले

See also  मनू भाकर ने इतिहास घडवला!