हरारे : वृत्तसंस्था
पहिल्या एकदिवसीय समन्यात मानहानीकारक पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघाने २४ तासांच्या आत त्या दारुण पराभवाची सव्याज परतफेड करताना झिंबाब्वेला १०० धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो पदार्पणाच्या समन्यात खतेही उघडू न शकलेला अभिषेक शर्मा.
४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकरांच्या झंझावाती शतक ठोकणाऱ्या अभिषेकच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २३४ धावा कुटल्या. त्याला ऋतुराज गायकवाड (नाबाद ७७) आणि रिंकू सिंग (नाबाद ४८) यांनीही मोलाची साथ दिली. ऋतुराज आणि अभिषेक यांनी ७६ चेंडूत १३७ धावांची भागीदारी रचली. शतक पूर्ण होताच अभिषेक बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या रिंकू सिंग याने अभिषेकचा झंझावात कायम ठेवत २२ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकार ठोकत भारतीय संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
धावफलक
भारत : शुभमन गिल – झे. बनेट गो. मुझरबानी २, अभिषेक शर्मा – झे. मेयर्स गो. मसाकाड्झा १००, ऋतुराज गायकवाड – नाबाद ७७, रिंकू सिंग नाबाद ४८, अवांतर ७, एकूण २ बाद २३४.
गडी बाद होण्याचा क्रम : १/१०, २/१४७
गोलंदाजी : ब्रायन बेनेट २-०-२२-०, ब्लेसिंग मुझरबानी ४-१-३०-१, टेंडई चतरा ४-०-३८-०, सिकंदर रझा ३-०-३४-०, ल्युक जॉंग्वे ४-०-५३-०, डायन मेयर्स १-०-२८-०, वेलिंग्टन मसाकड्झा २-०-२९-१
झिंबाब्वे : इनॉसेंट कैय्या -त्रि. गो. मुकेश कुमार ४, वेस्ले मेधेवेर – त्रि. गो. बिश्नोई ४३, ब्रायन बेनेट – त्रि. गो. मुकेश २६, डायन मेयर्स – झे. रिंकू गो. आवेश खान ०, सिकंदर रझा – झे. जुरेल गो. आवेश ४, जोनाथन कॅम्पबेल – झे. बिश्नोई गो. सुंदर १०, क्लाईव्ह मादांडे – पायचीत गो. बिश्नोई ०, वेलिंग्टन मसाकाड्झा – धावबंद १, ल्युक जॉंग्वे – झे. ऋतुराज गो. मुकेश ३३, ब्लेसिंग मुझरबानी – झे. सुंदर गो. आवेश २, चटरा – नाबाद ०.
गडी बाद होण्याचा क्रम : १/४, २/४०, ३/४१, ४/४६, ५/७२, ६/७३, ७/७६, ८/११७, ९/१२३, १०/१३४.
गोलंदाजी : मुकेश कुमार – ३.४-०-३७-३, अभिषेक शर्मा – ३-०-३६-०, आवेश खान – ३-०-२५-३, रवी बिश्नोई – ४-०-११-२, वॉशिंग्टन सुंदर – ४-०-२८-१, रियन पराग – १-०-५-०.
भारताने या समन्यात विजय मिळवीत केवळ पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरीच साधली नाही तर काही विश्वविक्रम देखील मोडीत कढले. त्यात अभिषेक शर्माच्या शतकाचाही समावेश आहे.
- भारताकडून टी २० खेळताना केवळ दुसऱ्याच समन्यात शतक ठोकून अभिषेकने दीपक हुडाचा विक्रम मोडीत काढला. हुडाने आपल्या तिसऱ्या समन्यात शतक झालकवले होते.
- टी २० सामन्यांमध्ये वेगवान शतक ठोकण्याच्या लोकेश राहुल (४६ चेंडू) याच्या विक्रमाशी अभिषेकने बरोबरी केली.
- टी २० सामन्यात शेवटच्या ढा षटकांत १६० धावा चोपताना भारताने श्रीलंकेच्या १५९ धावांचा विश्वविक्रम मोडीत काढला.
- टी २० समन्यात २३४ धावांचा डोंगर उभरतान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या २ बाद २२९ या धावसंख्येच्या विक्रमाला मागे सारले.