उभरत्या खेळाडूंना विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने अनेक फायदे होतात. त्यांची शारिरीक तंदुरुस्ती व संतुलन सुधारते, शिस्त लागते, आत्मविश्वास वाढतो व सांघिक भावना (टीम वर्क) शिकण्याची संधी मिळते.
क्रीडा इजा (स्पोर्ट्स इंजरीस ) व्यायाम करताना, खेळताना किंवा कुठल्याही क्रीडा प्रकारात सहभाग घेताना होऊ शकतात. अशा इजा लहान मुलांना तसेच प्रौढ खेळाडूंना देखील होऊ शकतात.
क्रीडा इजा होण्याची कारणे
- खेळताना मार लागल्यास
- अति प्रशिक्षण / स्नायूंचा अतिवापर
- अयोग्य पद्धतीचे प्रशिक्षण / तंत्र
- अपुरी शािररीक तयारी
- योग्य वॉर्मअप किंवा कुलडाऊन न करणेलहान मुलांमध्ये इजा होण्याची शक्यता जास्त असते. त्यांना स्वतःच्या शािररीक मर्यादेचे ज्ञान नसते. त्यांच्या अति उत्साहमुळे इजा होऊ शकतात.
वयस्कर खेळाडूंच्या इजा लवकर भरून येण्यास विलंब होतो. इजा दुर्लक्षित केल्यास त्यांचा त्रास वाढत जातो. स्थूलता असणाऱ्या खेळाडूंच्या सांध्यांवर व स्नायूवर जास्त ताण असतो व त्यामुळे इजा वाढतात.
सर्वसाधारण होणाऱ्या काही इजा
- घोटा मुरगळणे
- जांघेचा स्नायू आखडणे
- मांडीचा स्नायू आखडणे
- गुडघ्याचे अस्तिबंध फाटणे
- खांदा दुखावणे किंवा निखळणे
क्रीडा इजा टाळण्यासाठी काही उपाय
- वयानुसार खेळांचे तांत्रिक प्रशिक्षण
- योग शािररीक व्यायाम
- नियमित वॉर्मअप व कुलडाऊन
- योग्य क्रीडा साहित्यांचा वापर (उदा. हेल्मेट,बूट)
- अतिप्रशिक्षण टाळणे
- खेळण्याचे वेळापत्रक पाळणे
- शरीराला आवश्यक योग्य विश्रांती घेणे
- अनुभवी व प्रशिक्षित कोच निवडणे
- खेळांसाठी योग्य असे मानसिक प्रशिक्षण घ्यावे
- कोवळ्या वयात वेट लिफ्टिंग करू नये अन्यथा पाठीचे स्नायू व मणक्याची हाडे वाढून कायमची पाठदुखी होऊ शकते
- व्यायाम जेवणानंतर लगेच करू नये
- स्नायूसाठी उपयुक्त आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार घेणे
- सप्लिमेंट्स घेताना काळजी घेणे.
- मान्यता असलेले पदार्थच घेणे स्टिरॉइड्स वापरू नये
- इजा झाल्यास डॉक्टरांचा सल्ला लवकर घ्यावा
- खेळाडूंच्या आयुष्यात त्यांचे पालक व प्रशिक्षक खूप मोलाचे योगदान देऊ शकतात. त्यामुळे खेळाडूंच्या इजा टाळता येऊ शकतात. एक आरोग्यदायी व स्पर्धात्मक वातावरण निर्माण करता येते. सर्वांच्या सहकार्याने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो व त्यांना यश मिळण्यास मदत होते.
लेखक : डॉ. आनंद जाधव
(ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट, मणिपाल हॉस्पिटल बाणेर व लंडन जॉइंट्स क्लिनिक, पुणे)