Paris Olympics Shooting | दोन कांस्यपदक जिंकून पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मनू भाकरला तिसऱ्या कांस्य पदकाने मात्र हुलकावणी दिली. अखेरच्या शॉट पर्यंत चुरशीने लढणाऱ्या मनुला २५ मिटर्स पिस्तूल प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके पटकावणारी स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरण्याची तीची कामगिरी ऐतिहासिक ठरली. एवढेच नाही तर एकाच ऑलिंपिक स्पर्धेत तीन प्रकरांमध्ये अंतिम फेरी गाठणारीही ती पहिली खेळाडू ठरली आहे.
युवा खेळाडूंसाठी शास्त्रीय सल्ले!
पहिल्या सेरीजमध्ये पाच पैकी केवळ २ शॉटस् नेमके लागल्याने मनुला २ गुणांवर समाधान मानावे लागले. दुसऱ्या सिरीजमध्ये मात्र मनूने जोरदार पुनरागमन करताना ५ पैकी चार शॉटस् नेमके मारल्याने तिला चार गुण मिळाले आणि तिने सहा गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर झेप घेतली.
थेट दुसऱ्या स्थानावर झेप. Paris Olympics Shooting |
१५ शॉटस् नंतर मनूचे गुण होते १० आणि ती ४ जणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती. चौथ्या सिरीजमध्ये मनूची गुणसंख्या १३ झाली. यावेळी पहिल्यांदा बाद होणारी खेळाडू ठरली अमेरिकेची कॅटेलिन. तर मनू सहाव्या स्थानावर. येथे जिगरबाज मनूने पाचव्या सिरीजमध्ये पाचही शॉट नेमक्या लक्ष्यावर मारत आपली गुणांची संख्या १८ वर नेली आणि पोहोचली तिसऱ्या स्थानावर.
क्रीडा संघटनांमध्ये शिस्त आवश्यक
शूट आऊटमध्ये झाला घात Paris Olympics Shooting |
२८ गुण घेणाऱ्या मनूचा आणि हंगेरीच्या व्हेरोनीका यांच्यात टाय झाल्याने घेण्यात आलेल्या शूटआऊट मध्ये व्हेरोनीकाने बाजी मारली आणि मनूची हॅटट्रिक थोडक्यात हुकली.