मनू भाकर आणखी एका पदकाच्या शर्यतीत!

Paris Olympics Shooting |

Paris Olympics Shooting |
Paris Olympics Shooting |

Paris Olympics Shooting | भारताची स्टार शूटर मनू भाकरने २५ मिटर्स एअर पिस्तूल प्रकाराठी अंतिम फेरीत धडक मारली असून ती या ऑलिंपिकमध्ये आणखी एखादे पदक जिंकून इतिहास रचणार काय? याकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

या आधी दोन कांस्य पदकांची कमाई केलेल्या मनू भाकरने शुक्रवारी झालेल्या २५ मिटर्स एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली. २२ वर्षीय मानूने अत्यंत कौशल्यपूर्ण नेमबाजीचे प्रदर्शन करताना प्रीसीजन प्रकारात २९४ गुणांची कमाई केली. त्यानंतर रॅपिड राऊंडमध्ये २९६ गुणांची कमाई करीत एकूण ५९० गुणांसह दुसरे स्थान पटकवित दिमाखात अंतिम फेरी गाठली. हंगेरीच्या व्हेरोनीकाने ५९२ गुणांसह ऑलिंपिक विक्रम नोंदवीत पहिले स्थान मिळविले.

भारताची ईशा सिंग मात्र अंतिम फेरी गाठण्यात अयशस्वी ठरली. तिने ५८१ गुण नोंदविले. ती १८ व्या स्थानी फेकली गेली.

See also  चीनने जिंकले पहिले गोल्ड; भारताची निराशा