चीनने जिंकले पहिले गोल्ड; भारताची निराशा

Paris Olympics |

Paris Olympics |
Paris Olympics |

Paris Olympics | पॅरिस ऑलिंपिक्स २०२४ च्या पहिल्या दिवशी पदकाला गवसणी घालण्याचे भारतीय नेमबाजांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. १० मिटर्स एअर रायफल प्रकारात चीनने सुवर्ण तर दक्षिण कोरियाने रौप्य पदक पटकावले. पहिले सुवर्ण पटकावण्याचा मान चीनने पटकावला; तर या स्पर्धेतील पहिले पदक पटकावण्याचा मान काजाकिस्तानने मिळविला. त्यांनी जर्मनीला नमवित कांस्य पदक जिंकले.

भारतीय नेमबाजांना मात्र पात्रता फेरी पर करता आली नाही. भारताच्या सरबजित सिंगने ५७७ गुणांसह ९ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचा जर्मन प्रतिस्पर्धी रॉबिन वॅल्टर यानेही ५७७ गुणच घेतले; मात्र १० गुणांचा नेम त्याने १७ वेळा साधल्याने १६ वेळा १० गुणांचा नेम साधणाऱ्या सरबाजीत सिंगला त्याने मागे टाकले.

चिमा थेट १८ व्या स्थानी Paris Olympics |

भारताकडून पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या अर्जुनसिंग चिमा फारशी चमक दाखवू शकला नाही. ५७४ गुणांसह तो १८ व्या स्थानावर फेकला गेला. त्यामुळे सरबजित आणि चिमा या दोघांनाही पदकांच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. चीनच्या हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ यांनी हे सुवर्णपदक पटकावले. त्यांनी दक्षिण कोरियाच्या केयूम जीहेऑन आणि पार्क हाजुन या जोडीचा १६-१२ असा पराभव केला. केयूम आणि पार्क यांनी राउपीपाडक पटकावले. कझाकीस्तानच्या जोडीने कांस्य पदक पटकावले.

हेही वाचा 

रोईंगमध्ये बलराज पनवर चौथ्या स्थानी; उपांत्यपूर्व फेरी हुकली

शानदार समारंभाने पॅरिस ऑलिंपिक्सला सुरुवात

आज प्रॅक्टिस…. उद्या रेस्ट!

See also  जोकोविचने सुवर्ण पदक जिंकले! विंबल्डनमधील पराभवाची परतफेड!