हॉकी : भारत उपांत्यपूर्व फेरीनजिक! आयर्लंडला २-0 नमविले

Paris Olympics |

Paris Olympics Hockey |
Paris Olympics Hockey |

Paris Olympics | पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या समन्यात भारताने आयर्लंडला २-० असे आरामात नामवित उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली.

चिराग-स्वस्तिकराज जोडीची धमाल; पदकाच्या दिशेने आगेकूच!

या स्पर्धेत सर्वात कठीण असलेल्या पूल बी मध्ये भरताने आपली बाजू भक्कम केली आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ११ व्या मिनिटाला मिळालेल्या पेंनल्टी  स्ट्रोकचे आणि १९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेंनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत संघाला २-० असा विजय मिळवून दिल.

भारताने या स्पर्धेतील आपल्या सलामीच्या समन्यात न्यूझीलंडला ३-२ असे पराभूत केले; तर दुसऱ्या समन्यात बलाढ्य अर्जेंटीनाला १-१ असे बरोबरीत रोखले होते.

बचाव फळीवर लक्ष देणे आवश्यक Paris Olympics |

कठीण समजल्या जाणाऱ्या ब गटातील सर्वात कमकुवत संघ समजल्या जाणाऱ्या आयर्लंड संघाविरुद्ध भारताला विजय मिळेल ही गृहीत धरण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे भारतीय खेळाडूंनीही सुरुवातीपासून आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत लवकर आघाडी घेतली. तरीही भारतीय संघाच्या बचावफळीतील कमकुवत दुव्यांसंदर्भात भारतीय संघाला विचार करावा लागेल. पहिल्या हाफ मध्ये वारंवार आयर्लंडच्या गोलपोस्ट वर धडक मारणाऱ्या भारतीय आघाडीपटूंना दुसऱ्या हाफमध्ये फारशी चमक दाखवीत आली नाही.

मनू भाकर ने इतिहास घडवला!

या विजयामुळे भारतीय संघाचे ७ गुण झाले असून, त्यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तर आयर्लंड मात्र या परभवामुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.

See also  हॉकी : भारतीय संघाचा 'चक दे'; इंग्लंडला नामविले!