श्रीलंकेचा सुपडा साफ; भारताने दिला व्हाईट वॉश

T-20 Cricket |

T-20 Cricket |
T-20 Cricket |

T-20 Cricket | सुपर ओव्हर मध्येही अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या समन्यात भारताने श्रीलंकेचा ५ चेंडू राखून पराभव करीत 3 सामन्यांच्या टी २० मालिकेत ३-० असा एकतर्फी मालिका विजय साजरा केला.

मंगळवारी झालेल्या या मालीकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० समन्यात श्रीलंकेने पहिल्यांदाच भारतीय संघाला दडपणाखाली आणले. नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण करणाऱ्या श्रीलंकण संघाने भारतीय फलंदाजांची  आघाडीची मजबूत फळी अक्षरक्ष: कापून काढली.

निम्मा संघ ४८ वर गारद T-20 Cricket |

आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वल केवळ १० धावा करून तंबूत परतला तर संजू सॅमसन सलग दुसऱ्या संयत भोपळा फोडू शकला नाही. तिक्षणाच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. रिंकू सिंग आणि कर्णधार सूर्या स्वस्तात बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद ४८ अशी झाली होती. शुभमन गिलने एक बाजू लावून धरत ३७ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याला खालच्या फळीतील रियन पराग (२६) आणि वॉशिंग्टन सुंदर (२५) यांनी चांगली साथ देत भारताला १३७ धवांपर्यंत पोहोचविले.

श्रीलंकेची धडाकेबाज सुरुवात T-20 Cricket |

विजयासाठी केवळ १३८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकान संघाने धडाक्यात सुरुवात केली. फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर यजमानांनी घरचा अनुभव वापरत ८ षटकांत फलकावर अर्धशतक झालकवले. रवी बिश्नोईने निसांकाला २६ धावांवर रियन पराग करवी झेलबाद करीत भारताला पहिला बळी मिळवून दिला. तरीही कुसल मेंडिस (४३) आणि कुसल परेरा (४६) यांनी श्रीलंकेची बाजू लावून धरली.

परेरा आणि मेंडिस बाद होत नसले तरी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजीत चांगले बदल करीत त्यांना जखडून ठेवले.  त्याने रियान परागसह रिंकू सिंगलाही गोलंदाजी दिली. त्याने स्वत:ही एक षटक टाकत ५ धावांच्या बदल्यात दोन बळी मिळविले आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना भारतीय धावसंख्या ओलंडण्यापासून रोखले. आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरचा थरार T-20 Cricket |

सुपर ओव्हर मधील थरार अंगावर रोमांच उभे करणारा ठरला. भारताकडून सूर्याने वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीला पाचारण केले. कुशल मेंडिसने पहिल्या चेंडूवर १ धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात कुसल परेरा बिश्नोईच्या हाती झेल देऊन बाद झाला. पुढच्याच चेंडूवर निसांकानेही तीच चूक केली आणि रिंकू सिंगने त्याचा झेल घेत श्रीलंकेचा डाव तीन चेंडूतच खलास केला. त्यावेळी श्रीलंकेच्या खात्यात मेंडिसची एक आणि एका अवांतर आशा केवळ दोन धावा जमा होत्या. भारताला विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा सूर्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत मिळविल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. वॉशिंग्टन सुंदर सामन्याचा तर सूर्यकुमार यादव मालिकेचा मानकरी ठरला.

See also  भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील : अंजली भागवत

धावफलक : भारत : यशस्वी जैस्वल पायचीत गो. तिक्षणा १०, शुभमन गिल यष्टीचीत कुसल मेंडिस गो. हसरंगा ३९, संजू सॅमसन झे. हसरंगा गो. विक्रमसिंघे ०, रिंकू सिंग झे. पथिराना गो. तिक्षणा १, सीरयाकुमार यादव झे. हसरंगा गो. फर्नांडो ८, शिवम दुबे झे. कुसल मेंडिस गो. रमेश मेंडिस १३,रियन पराग झे. रमेश मेंडिस गो. हसरंगा २६, वॉशिंग्टन सुंदर त्रि. गो तिक्षणा २५, बिश्नोई नाबाद ८, सिराज धावबाद ०, अवांतर ७, एकूण २० षटकांत ९ बाद १३७. गडी बाद होण्याचा क्रम : १/११, २/ १२, ३/१४, ४/३०, ५/४८, ६/१०२, ७/१०५, ८/ १३७, ९/१३७. गोलंदाजी : विक्रमसिंघे ४-०-१७-१, तिक्षणा ४-०-२८-३ फर्नांडो २-०-११-१, रमेश मेंडिस ३-०-२६-१, हसरंगा ४-०-२९-२, कुसल मेंडिस ३-०-२४-०.

चिराग-स्वस्तिकराज जोडीची धमाल; पदकाच्या दिशेने आगेकूच!

श्रीलंका : निसांका झे. पराग गो. बिश्नोई २६, मेंडिस पायचीत गो. बिश्नोई ४३, परेरा झे. व. गो. रिंकू सिंग ४६, हसरंगा झे. बिश्नोई गो. वॉशिंग्टन सुंदर ३, असलंका झे. सॅमसन गो. सुंदर ०, आर. मेंडिस झे. गिल गो. रिंकू सिंग ३, के. मेंडिस झे. रिंकू गो. सूर्या १, विक्रमसिंघे नाबाद १, तिक्षणा झे. सॅमसन गो. सूर्या ०. अवांतर १०, एकूण २० षटकांत ८ बाद १३७. गडी बाद होण्याचा क्रम : १/५८, २/११०, ३/११७, ४/११७, ५/१२९, ६/१३२, ७/१३२, ८/१३२.  गोलंदाजी : खालील अहमद ३-०-२८-०, सिराज ३-०-११-०, सुंदर ४-०-२३-२, बिश्नोई ४-०-३८-२, रियान पराग ४-०-२७-०, रिंकू सिंग १-०-३-२, सूर्यकुमार यादव १-०-५-२.

सुपर ओव्हर 

श्रीलंका : के. मेंडिस नाबाद १, के परेरा झे. बिश्नोई गो. सुंदर ०, निसांका झे. रणकू सिंग गो. सुंदर ०. अवांतर १. एकूण ३ चेंडूत २ बाद २ 

भारत : सूर्यकुमार यादव नाबाद ४, गिल नाबाद ०, एकूण : एका चेंडूत ४ धावा!