निखत झरीनचा धक्कादायक पराभव!

Paris Olympics |

Paris Olympics |
Paris Olympics |

Paris Olympics | देशाला आणखी एक पदक हमखास मिळवून देण्याची अपेक्षा असलेली भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनला उप उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी गुरुवारी भारताच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजीतील कांस्य पदक पटकावल्याचा आनंद भारतीय क्रीडा रसिक फार काळ साजरा करू शकले नाहीत. अवघ्या तसभारच्या अंतराने भारताला सलग तीन परभवांना समोरे जावे लागले.

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने ब्रॉन्झ जिंकले!

आशियाई सुवर्णपदक विजेती चीनच्या वू यु हिने गुरुवारी झरीनला ५-0 असे नमविताना तिचे ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत बिगरमानांकित असलेल्या निखतची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. या समन्यात तिच्यापेक्षा वरचढ मानांकन असलेल्या वू यु विरुद्ध निखतला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही. युने आपला पूर्ण अनुभव पणाला लावत निखतला ५-० असे नामविले.

हॉकीतही पराभवाचा धक्का Paris Olympics |

पहिल्या तिन्ही समन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला ब गटातील आपल्या बेल्जियम विरुद्धच्या समन्यात मात्र तशी कमाल करता आली नाही. ३ सामन्यांपैकी २ विजय आणि एक बरोबरी साधत उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाने बेल्जियम विरुद्ध सुरुवातीला चांगला खेळा केला. तिसऱ्या क्वार्टर पर्यंत दोन्ही संघ १-१ अशी बरोबरी साधून होते. मात्र सामन्याच्या अखेरच्या काही मिनिटांत बेल्जियमच्या आघाडीच्या फळीने भारतीय बचाव भेदत गोल केला. हाच गोल त्याचा विजयी गोल ठरला.

आणखी एका तिरंदजची निराशा Paris Olympics |

तिरंदाजीमध्ये आणखी एक भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव ३२ चा राऊंड पर करू शकला नाही. प्रवीणला आपल्या पहिल्याच समन्यात चीनच्या काओ वेनचाओ विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा

भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील : अंजली भागवत

चॅम्पियन बनण्यासाठी हवी जिगर, कठोर परिश्रम

खेळाडूंसाठी आहार अत्यंत महत्त्वाचा

See also  लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत; हरमीतनेही मारली बाजी