Paris Olympics | सिन नदीच्या पत्रातील एकमेवा द्वितीय ठरलेल्या आशा शानदार समारंभाने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांना आज सुरुवात झाली. पहिल्यांदाच स्टेडियमच्या बाहेर घेण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. फ्रान्सची राजधानी असलेल्या परिसमध्ये सिन नदीच्या पत्रात होड्यांमधून आलेल्या सहभागी खेळाडूंनी सहा किलोमीटर्सच्या रांगेत दिलेली सलामी शानदार ठरली.
या सलामी मोहिमेत भारतीय चमुचे नेतृत्व केले ते पाचवेळा ऑलिंपिक मध्ये सहभाग नोंदविणारा शरथ कमल आणि दोनवेळा पदक विजेती ठरलेली भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू. फ्रान्सचा महान फुटबॉलपटू झिनेदिन झिदान याची मशाल घेऊन येण्याची रेकॉर्ड केलेली क्लिप प्रदर्शित झाली आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या परेडला सुरुवात झाली. यात 205 देशांच्या आणि एका निर्वासितांच्या संघाचा समावेश होता.
पाकिस्तानला नमवून श्रीलंका अंतिम फेरीत
लेडी गागाचा शानदार परफॉर्मन्स Paris Olympics |
फ्रान्सचे अध्यक्ष इमन्युएल मॅक्रोन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी खेळाडूंची सलामी स्वीकारल्यानंतर सुरू झाला तो प्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागा हिच्या परफॉर्मन्सचा. लेडी गागाने उपस्थितांना मोहवून टाकले. त्या पाठोपाठ प्रेमाची नागरी अशी ख्याती असलेल्या पॅरिसच्या नभंगणात जेट विमाने घोंगावली. त्यांनी पांढऱ्या धुराच्या सहाय्याने आकाशात चितारलेले ह्रदयच्या आकाराचे चित्र उपस्थतांच्या ह्रदयाचा ठेका चुकवित होते.
शानदार उद्घाटन समारंभाचा समरोफि तितकाच शानदार ठरला. फ्रेंच अध्यक्ष बाच यांच्या भाषणानंतर झिदानला स्टेजवर बोलावण्यात आले. त्याने खेळाडूंच्या परेड दरम्यान ऑलिंपिक ज्योत वाहून नेणाऱ्या खेळाडूच्या हातातील ज्योत घेतली आणि फ्रान्सचा टेनिस स्टार राफेल नदाल याच्याकडे सुपूर्द केली.
याचवेळी आयफेल टॉवरचा एक एक मजला झळाळून उठला आणि ही क्रीडा ज्योत सिन नदीच्या पत्रात उभ्या असलेल्या बोटीत नेली. तेथे सेरेना विल्यम्स, कार्ल लुईस, नदीया कोमेन्सी सारखे दिग्गज खेळाडू उपस्थित होते. ही बोट किनाऱ्यावर येताच अमेली माउरिस्मो या फ्रान्सच्या निवृत्त टेनिसपटूने ही ज्योत स्वीकारली. त्याच्याबरोबर फ्रान्सचा महान बास्केटबॉलपटू टोणी परकर सहभागी झाला. या दोघांनी धावत जाऊन ही ज्योत टेड्डी रीनर आणि मेरी जोस पेरेक यांच्याकडे सुपूर्द केली. या दोघांनी मग २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकसाठीची मुख्य ज्योत प्रज्वलित केली. ही ज्योत नंतर हॉट एअर बलूनच्या सहाय्याने ३० मिटर उंचीवर नेण्यात आली. याचवेळी फ्रेंच अध्यक्ष बाच यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली.