भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील : अंजली भागवत

Pune Olympic festival |

Pune Olympic festival |
Pune Olympic festival |

Pune Olympic festival | भारतीय खेळाडूंनी गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अतिशय चांगली तयारी केली असून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले आहे हे लक्षात घेतले तर यंदाच्या ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्री ऑलिंपिक नेमबाज अंजली भागवत यांनी येथे व्यक्त केली.

गुडघ्याचे ‘एसीएल लिगामेंट’ फटल्यास काय?

पॅरिसमध्ये सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा निमित्ताने डेक्कन जिमखाना क्लबने नुकत्याच आयोजित केलेल्या ऑलिम्पिक महोत्सवाचे अंजली भागवत व ऑलिंपिक बॅडमिंटनपटू निखिल कानेटकर यांच्या हस्ते झाले. डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सरचिटणीस मिहीर केळकर आणि वित्त सचिव गिरीश इनामदार यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते. यानिमित्ताने ऑलिंपिक विषयक आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

युवा खेळाडूंची ऊर्जा यश मिळवेल Pune Olympic festival |

भागवत यांनी पुढे सांगितले की यंदाच्या ऑलिंपिक मध्ये आपले अनेक युवा खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्यामध्ये चमक दाखवण्याची खूप ऊर्जा निर्माण झाली आहे. सुदैवाने गेल्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी सातत्यपूर्ण चमक दाखविली आहे‌. त्याचा फायदा त्यांना ऑलिंपिक मध्ये निश्चितपणे मिळणार आहे. केंद्र शासनाने तसेच वेगवेगळ्या राज्यातील शासनांनी खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा, आर्थिक सहकार्य चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या दिल्या आहेत त्यामुळे अतिशय निश्चिंत मनाने या खेळाडूंनी सराव केला आहे. त्याचे प्रतिबिंब यंदाच्या ऑलिंपिक मध्ये निश्चितपणे दिसेल.

खेळाडूंसाठी आहार अत्यंत महत्त्वाचा

पालकांनाही मिळेल प्रेरणा Pune Olympic festival |

क्रीडा विषयक प्रदर्शनाबद्दल कौतुक व्यक्त करीत कानेटकर यांनी सांगितले,’ अशा उपक्रमांमधून खेळाडूंबरोबरच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळणार आहे खेळाडूंच्या यशामध्ये पालकांचाही मोठा वाटा असतो. यंदाच्या ऑलिंपिक साठी भारतीय खेळाडूंची खूप चांगली तयारी झाली आहे, त्यामुळे गतवेळच्या ऑलिंपिकच्या तुलनेमध्ये यंदा भारतीय खेळाडू अधिक चांगली पदके जिंकून आणतील अशी मला आशा आहे. प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी आणि सामन्याच्या वेळी मानसिक दृष्ट्या भक्कम आणि खणखर असणे आवश्यक आहे. त्याचीही आपल्या खेळाडूंनी मानसिक तंदुरुस्ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली आहे‌. त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे पदक जिंकण्यासाठी होणार आहे.

See also  निखत झरीनचा धक्कादायक पराभव!

मिहीर केळकर आणि गिरीश इनामदार यांनी ऑलिंपिक महोत्सव आयोजनाबद्दल माहिती दिली तसेच भारताच्या ऑलिम्पिक चळवळीमध्ये डेक्कन जिमखाना क्लबने किती मोठा वाटा उचलला होता हे देखील सांगितले.