Paris Olympics | पॉरिस ऑलिंपिकच्या सहाव्या दिवशी भारताला आणखी एक मोठा धक्का सहन करावा लागला. बॅडमिंटनमध्ये दुहेरीचे पदक निश्चित मिळविणार असे मानल्या गेलेल्या सात्विक-चिराग जोडीला उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा सामना करावा लागल्याने भारताचे बॅडमिंटन दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
पहिला गेम सहज जिंकला Paris Olympics |
पहिला गेम सहज जिंकल्यानंतर सात्विक-चिराग हा सामना आरामात जिंकतील असे वाटत असतानाच मलेशियाच्या एरॉन चीया आणि वूयी यीक सोह या जोडीने जोरदार पुनरागमन करीत नंतरचे दोन्ही गेम जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली.
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने ब्रॉन्झ जिंकले!
पहिल्या सेटमध्ये सात्विक चिरागने सुरुवतीपासून आक्रमक खेळ करीत या गेममध्ये मलेशीयन जोडीला संधी दिली नाही. हा गेम २१-१३ असा जिंकत त्यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मलेशीयन जोडीने सात्विक चिरागला जखडून ठेवत दुसरा गेम २१-१४ असा जिंकला.
निर्णायक गेममध्ये मलेशीयन नडले Paris Olympics |
समन्यात एक-एक अशी बरोबरी झाल्यानंतर तिसऱ्या गेममध्ये वूयी आणि एरॉन यांनी सात्विक चिराग जोडीला झुंजवले. या जोडीने सुरुवातीला आघाडी घेतली मात्र भारतीय जोडीने त्यांना ५-५ असे बरोबरीत आणले. त्यानंतर मलेशीयन जोडीने ८-६ अशी आघाडी घेतली. पुनः एकदा ही आघाडी मोडून कढत सात्विक-चिराग जोडीने ८-८ अशी बरोबरी साधून ११-९ अशी आघाडीही घेतली. त्यांनी ही आघाडी आणखी वाढवत १४-११ अशी केली. त्यानंतर मात्र वूयी आणि एरॉन यांनी जोरदार पुनरागमन करीत १४-१४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर मात्र मलेशीयन जोडीने मागे वळून न पाहता हा गेम आणि सामना २१-१३, १४-२१, १६-२१ असा जिंकत उपांत्यफेरीत धडक मारली.