पाकिस्तानला नमवून श्रीलंका अंतिम फेरीत

women's Asia Cup |
women's Asia Cup |

Asia cup cricket | श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य समन्यात यजमान श्रीलंकेने पाकिस्तानचा तीन गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. अजिंक्यपदासाठी त्यांना तगडया भारतीय महिलांशी दोन हात करावे लागतील.

हेही वाचा 

‘पी हळद हो गोरी’ असे होत नसते…

पाकिस्तानच्या महिलांनी यजमानांचे निमंत्रण स्वीकारत चांगली सुरुवात केली. आघाडीवीर गुल फिरोजा आणि मुनीबा अली यांनी सावध सुरुवात करताना ९ षटकांत ६१ धावांची सलामी दिली. दहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गुल फिरोजा २५ धावांवर बाद झाली आणि पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक लागला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धावगती रोखून धरली आणि पाकिस्तानला निर्धारित २० षटकांत १४० धावांवर रोखले.

श्रीलंकेची खराब सुरुवात Asia cup cricket |

श्रीलंकान संघाची सुरुवात खराब झाली पहिलेच षटकात त्यांची विशमी गुणरत्ने भोपळाही न फोडता तंबूत परतली. तिच्या जागी मैदानावर आलेल्या हर्षिता समरविक्रमाने दोन चौकार मारून चांगली सुरुवात केली; संघाच्या मात्र १९ धावा झालेल्या असताना तीही तंबूत परतली.

अट्टापट्टूने सावरला डाव Asia cup cricket |

कर्णधार चामरी अट्टापट्टूने मग सामन्याची सूत्र हाती घेत श्रीलंकेचा डाव सावरला. ४८ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार ठोकत तिने ६३ धावा केल्या. तिला सादिया इक्बालने त्रिफळा बाद केले. यावेळी श्रीलंकन महिला अडचणीत आल्या असताना त्यांची विकेटकीपर फलंदाज अनुष्का संजीवनीने झटपट २४ धावांची  खेळी करीत श्रीलंकेला विजयाच्या नजीक आणून सोडले.

See also  जोकोविचने सुवर्ण पदक जिंकले! विंबल्डनमधील पराभवाची परतफेड!