रोनाल्डोच्या पोर्तुगालला फ्रांसने चारली धूळ! यजमान जर्मनीही आऊट!!

हॅम्बर्ग : वृत्तसंस्था 

युरो चषक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकवत फुटबॉलला अलविदा करण्याचे क्रिस्टियानो रोंनाल्डो स्वप्न अखेर फ्रान्सने धुळीला मिळविले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात फ्रान्सने पोर्तुगालला पेनल्टी शूट आउट मध्ये ५-३ असे पराभूत करीत स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात फ्रान्स आणि पोर्तुगाल संघांनी अतिशय आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पोर्तुगालचा रोनाल्डो आणि फ्रान्सचा कायलीन एमबाप्पे या दोघा दिग्गजांच्या खेळकडे साऱ्या फुटबॉल विश्वाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र नियमित वेळेत दोन्ही संघांना गोल नोंदवीत आला नाही. अतिरक्त वेळेतही दोन्ही संघ गोल नोंदवू शकले नाहीत. शेवटी गोल शून्य बरोबरी झाल्याने सामना टायब्रेकर पर्यंत गेला.

शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या उपउपान्त्य फेरीच्या या सामन्यात टायब्रेकर मध्ये जोआओ फेलीक्सची किक हुकली आणि फ्रान्सने बाजी मारली.

यजमान जर्मनीही आऊट 

स्टुटगार्ट येथे झालेल्या दुसऱ्या उपउपान्त्य फेरीच्या समन्यात स्पेनने यजमान जर्मनीचा पराभव करीत उपान्त्य फेरीत धडक मारली. स्पेनने अखेरच्या क्षणी गोल केल्याने त्यांना यजमानांच्या विरोधात २-१ असा विजय मिळवता आला.

निर्धारित वेळेपर्यन्त दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली होती. सामना टायब्रेकर पर्यन्त जाणार असे वाटत असतानाच सामन्याच्या ११९ व्या मिनिटाला स्पेनचा बदली खेळाडू मायकल मेरिनो याने निर्णायक गोल करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

See also  ‘लक्ष्या’ च्या दिशेने!