कर्लोस अल्कारेझ उपांत्यपूर्व फेरीत; विम्बल्डनची रंगत वाढली!

विंबल्डन : वृत्तसंस्था 

लंडनच्या आल्हाददायक वातावरणात हिरवळीवर सुरू असलेल्या विंबल्डन स्पर्धेची रंगत आता वाढली असून, अनेक मानांकित खेळाडूंनी आपल्या तगडया खेळाच्या जोरावर उपउपान्त्य फेरीत धडक मारली आहे. कर्लोस अल्कारेझ आणि जोकोविच या संभाव्य विजेत्या समजल्या जाणाऱ्या टेनिसपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली; मात्र त्यांना यावेळी चार सेट पर्यन्त झुंजावे लागले.

महिलांमध्ये मात्र पोलंडच्या अग्र मानांकित इगा स्वीयातेक हिला तिसऱ्या फेरीतच आपला गाशा गुंडाळव लागला. स्वीयतेक हिने तिसऱ्या फेरीच्या सामन्याला जोशात सुरुवात केली. तिने पहिला सेट जिंकलाही; मात्र काजाकिस्तानच्या युलिया पुतिनत्सेवाने  नंतरच्या दोन्ही सेट्स मध्ये जोरदार पुनरागमन करताना दोन्ही सेट आणि सामना जिंकत या स्पर्धेतील मोठा उलटफेर नोंदविला. यउळियाने हा सामना ३-६, ६-१, ६-२ असा जिंकला.

अल्कारेझ यालाही आपली आगेकूच कायम ठेवताना चार सेट्स पर्यन्त झुंजावे लागले. फ्रान्सच्या उगो हम्बर्ट याच्या विरुद्ध अल्कारेझने पहिले दोन सेट ६-३,६-४ असे सहज जिंकले मात्र तिसरा सेट हम्बर्टने ६-१ असा जिंकून समन्यात रंगत आणली. चौथ्या सेटमध्ये मात्र अल्कारेझने ७-५ अशी बाजी मारत पुढची फेरी गाठली.

सर्बीयाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यालाही चौथी फेरी गाठताना चार सेट्स पर्यन्त झुंजावे लागले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या  अलेक्सि पॉपिरीन याचा ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) असा पराभव केला.

 

See also  विंबल्डन : अल्कारेज चॅम्पियन!