हरारे : वृत्तसंस्था
भारत आणि झिंबाब्वे यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी -20 सामन्यांच्या मालिकेतील् तिसरा सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या या यशात कर्णधार शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋतुराज गायकवाड यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने गिलच्या ४९ चेंडूतील ६६ धावा आणि ऋतुराज गायकवाड याच्या २८ चेंडूतील ४९ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ बाद १८२ धवांपर्यंत मजल मारली. यशस्वी आणि गिल यांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावांची वेगवान भागीदारी नोंदविली; मात्र सिकंदर रझाने यशस्वी जयस्वालला बेन्नेटकडे झेल देण्यास भाग पाडले. यशस्वीने २७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकरांच्या जोरावर ३६ धावा केल्या. त्यानंतर आलेला आणि दुसऱ्या समन्यात शतक झळकावणारा अभिषेक शर्मा फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने १० धावा केल्या.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ऋतुराज गायकवडने ४ चौकार आणि ३ षटकरांच्या जोरावर २८ चेंडूत झंझावाती ४९ धावा केल्या. संजू सॅमसनने त्याला साथ दिली.
सामना जिंकण्यासाठी १८३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या झिंबाब्वे संघाची सुरुवात चांगली झाली नाही त्यांचा निम्मा संघ ७ व्या शतकातच अवघ्या ३९ धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतर मात्र डिऑन मेयर्स आणि क्लाइव मडांडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रत्यं केला. मेयर्सने ४९ चेंडूत ६५ तर मडांडे याने २६ चेंडूत ३७ धावा करीत भारतीय खेळाडूंची धडधड वाढवली होती. मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांनी प्रत्येकी ४ बळी घेत झिंबाब्वे संघाला १५९ धाववर रोखत विजयावर शिक्का मोर्तब केले. १५ धावांत ४ बळी घेणारा वॉशिंग्टन सुंदर सामन्याचा मानकरी ठरला.