पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिंपिकमधील भारताच्या मोहिमेची सुरुवात आज गुरुवारपासून तिरंदाज दीपिका कुमारी आणि त्यांची टीम करणार आहे. २०१२ च्या लंडन ऑलिंपिक नंतर पहिल्यांदाच भारताचा सहा सदस्यांचा पूर्ण संघ ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत आहे. हा संघ ५ पदकांच्या लढाईत आपले कौशल्य पणाला लावणार आहे. त्यात पुरुष व महिला एकेरी, आणि सांघिक स्पर्धेचा समावेश आहे. यावेळी तिरंदाजी संघ भारताला पदकांचे खाते उघडून देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी होत असलेल्या मानांकन (Seeding) ठरवीण्याच्या फेरीत प्रत्येक देशाच्या खेळाडूंना ७२ बाण मिळतील. त्यावर त्या सहा खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर प्रत्येक संघाचे मानांकन ठरेल. या मानांकन फेरीत पहिले चार मानांकन मिळविणारे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत (Quarter finals) दाखल होतील तर उर्वरित ८ व्या टे १२ व्या क्रमांकावरील संघ उपांत्यपूर्व फेरीतील उरलेल्या चार जागांसाठी एकमेकाविरुद्ध लढतील.
भारतीय खेळाडूंचे पॅरिस ऑलिंपिक मधील स्पर्धांचे वेळापत्रक (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
२५ जुलै (गुरुवार)
- तिरंदाजी – दुपारी १ वाजता
२६ जुलै (शुक्रवार)
- उद्घाटन समारंभ – रात्री ११ पासून
२७ जुलै (शनिवार)
- रोईंग.
- शूटिंग (एअर रायफल) – दुपारी १२.३० वाजता.
- बॅडमिंटन (महिला-पुरुष) – दुपारी १२.५० वाजता.
- टेनिस (पुरुष).
- टेबल टेनिस, बॉक्सिंग (महिला).
- पुरुष हॉकी (भारत वि. न्यूझीलंड) – रात्री ९.०० वाजता.
२८ जुलै (रविवार)
- बॅडमिंटन (महिला) – दुपारी १२.०० वाजता.
- शूटिंग (एअर रायफल) – दुपारी १२.४५ वाजता.
- तिरंदाजी (महिला संघ) – दुपारी १ वाजता.
- रोईंग, टेबल टेनिस.
- बॉक्सिंग (५० किलो) – दुपारी ३.५० वाजता.
- टेनिस, जलतरण.
२९ जुलै (सोमवार)
- शूटिंग (एअर रायफल) – दुपारी १२.३० वाजता.
- तिरंदाजी (पुरुष संघ) – दुपारी १ वाजता.
- बॅडमिंटन.
- हॉकी (भारत विरुद्ध अर्जेंटीना) – सायंकाळी ४.१५ वाजता.
- रोईंग.
- टेबल टेनिस (राऊंड ६४).
- टेनिस, जलतरण.
३० जुलै (मंगळवार)
- बॅडमिंटन – दुपारी १२ वाजता.
- शूटिंग (ट्रॅप) – दुपारी १ वाजता.
- टेबल टेनिस.
- रोईंग.
- बॉक्सिंग (५७ किलो) – दुपारी २.३० वाजता.
- अश्वारोहण, टेनिस.
- तिरंदाजी (वैयक्तिक).
- हॉकी – भारत विरुद्ध आयलंड -सायंकाळी ४.४५ वाजता.
३१ जुलै (बुधवार)
- बॅडमिंटन – दुपारी १२ वाजता.
- शूटिंग (ट्रॅप फायनल) – दुपारी १२.३० वाजता.
- रोईंग.
- अश्वारोहण.
- टेबल टेनिस (राऊंड १६).
- बॉक्सिंग (७५ किलो) – दुपारी ३ वाजता.
- तिरंदाजी (राऊंड ३२) – दुपारी ३.३० वाजता.
- टेनिस उपांत्यफेरी – दुपारी ३.३० वाजता.
१ ऑगस्ट (गुरुवार)
- २० कि. मी. चालण्याची शर्यत.
- बॅडमिंटन क्वार्टर फायनल – दुपारी १२ वाजता.
- गोल्फ, तिरंदाजी.
- शूटिंग (५० मिटर रायफल) – दुपारी १ वाजता.
- रोईंग.
- हॉकी – भारत विरुद्ध बेल्जियम – दुपारी १.३० वाजता.
- बॉक्सिंग – सेलिंग – टेबल टेनिस – टेनिस.
२ ऑगस्ट (शुक्रवार)
- बॅडमिंटन – दुपारी १२ वाजता.
- गोल्फ, रोईंग.
- शूटिंग (५० मि. रायफल) – दुपारी १२.३० वाजता.
- तिरंदाजी (मिश्र) – दुपारी १ वाजता.
- ज्युदो, टेबल टेनिस, टेनिस, सेलिंग.
- हॉकी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – सायंकाळी ४.४५ वाजता.
- बॉक्सिंग, ५ हजार मिटर धावणे (महिला)
- गोळफेक.
३ ऑगस्ट (शनिवार)
- बॅडमिंटन (दुहेरी) – दुपारी १२.०० वाजता.
- गोल्फ, रोईंग, शूटिंग.
- तिरंदाजी (महिला) – दुपारी १ वाजता.
- सेलिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग, टेनिस.
४ ऑगस्ट (रविवार)
- बॅडमिंटन (सेमीफायनल) – दुपारी १२ वाजता.
- गोल्फ.
- शूटिंग (स्किट) -दुपारी १२.३० वाजता.
- तिरंदाजी, अश्वारोहण.
- हॉकी (उपांत्यपूर्व फेरी) – दुपारी १.३० वाजता.
- ३ हजार मिटर्स स्टिपलचेस (महिला)
- सेलिंग.
- लांब उडी – दुपारी २.३० वाजता.
- बॉक्सिंग (उपांत्यपूर्व फेरी) दुपारी २.३० वाजता.
५ ऑगस्ट (सोमवार)
- शूटिंग (२५ मि. पिस्तूल) – दुपारी १ वाजता.
- बॅडमिंटन (अंतिम फेरी) – दुपारी १.१५ वाजता.
- टेबल टेनिस, सेलिंग.
- ४०० मिटर्स (महिला)
- कुस्ती (६८ किलो) – सायंकाळी ६.३० वाजता.
- ३ हजार मिटर्स स्टिपलचेस (पुरुष) – रात्री १०-३५ वाजता.
- ५ हजार मिटर्स धावणे (महिला).
६ ऑगस्ट (मंगळवार)
- भलाफेक पात्रता (पुरुष) – दुपारी १.५० वाजता.
- कुस्ती (५० किलो) – दुपारी ३ वाजता.
- ४०० मिटर्स धावणे, सेलिंग, टेबल टेनिस.
- हॉकी (उपांत्यफेरी) – सायंकाळी ५.३० वाजता.
- लांब उडी – रात्री ११.५० वाजता.
- बॉक्सिंग.
७ ऑगस्ट (बुधवार)
- रेस वॉक मॅरेथॉन मिश्र रिले – सकाळी ११ वाजता.
- सेलिंग.
- गोल्फ. – सकाळी १२.३० वाजता.
- टेबल टेनिस.
- उंचउडी (पुरुष).
- १०० मिटर्स अडथळा शर्यत (हरडल्स) – दुपारी १.४५ वाजता.
- भलफेक पात्रता (महिला).
- कुस्ती (महिला) – दुपारी २.३० वाजता.
- तिहेरी उडी (पुरुष).
- वेटलिफ्टिंग (महिला) – रात्री ११.०० वाजता.
- ४०० मिटर्स धावणे (महिला).
- बॉक्सिंग.
- ३ हजार मिटर्स स्टिपलचेस (पुरुष) अंतिम फेरी. – रात्री १.१० वाजता.
८ ऑगस्ट (गुरुवार)
- गोळफेक (महिला)
- टेबल टेनिस – दुपारी १.३० वाजता.
- १०० मिटर्स अडथळा शर्यत (हरडल्स) – दुपारी २.०५ वाजता.
- कुस्ती (५३ किलो) – सकाळी २.३० वाजता.
- हॉकी अंतिम लढत – सायंकाळी ५.३० वाजता.
- बहाल फेक अंतिम फेरी (पुरुष) रात्री ११.५५ वाजता.
- बॉक्सिंग, गोल्फ.
९ ऑगस्ट (शुक्रवार)
- गोल्फ, टेबल टेनिस.
- ४ बाय ४०० मिटर्स रिले (महिला) – दुपारी २.१० वाजता.
- ४ बाय ४०० मिटर्स रिले (पुरुष) – दुपारी २.३५ वाजता.
- कुस्ती (५७ किलो) – दुपारी २.३० वाजता.
- १०० मिटर्स अडथळा शर्यत (हरडल्स) – दुपारी ३.३५ वाजता.
- गोळफेक अंतिम फेरी.
- ४०० मिटर्स धावणे (महिला)
- तिहेरी उडी (पुरुष) अंतिम फेरी.
- बॉक्सिंग (५० किलो) – रात्री १.०० वाजता.
१० ऑगस्ट (शनिवार)
- टेबल टेनिस (कांस्य पदकासाठी लढत).
- गोल्फ अंतिम फेरी – दुपारी १२.३० वाजता.
- कुस्ती (७६ किलो) – दुपारी ३.०० वाजता.
- उंच उडी (पुरुष) – रात्री १०.४० वाजता.
- १०० मिटर्स अडथळा शर्यत (हरडल्स) – रात्री ११.१५ वाजता.
- ४ बाय ४०० मिटर्स रिले (पुरुष व महिला) अंतिम फेरी – रात्री १२.४० वाजता.
- बॉक्सिंग (५७ किलो) – रात्री १ वाजता.
११ ऑगस्ट (रविवार)
कुस्ती (७६ किलो) दुपारी २.३० वाजता.