विंबल्डन : अल्कारेज चॅम्पियन!

लंडन : वृत्तसंस्था 

पहिल्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये सर्बीयाच्या माजी विजेत्या नोव्हाक जोकोविचची सर्विस भेदणाऱ्या कर्लोस अल्कारेजने विम्बल्डनच्या अंतिम लढतीत रविवारी कमाल केली. त्याने पहिल्या दोन सेटमध्ये जोकोविचची सर्व्हिस भेदत सेटला सुरुवात केली आणि मग त्याने मागे वळून पहिले नाही. स्पेनच्या तिसऱ्या मानांकीत अल्कारेजने मग आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर दुसऱ्या मानांकित जोकोविचला ६-२, ६-२ ७-६ (४) असे सरल तीन सेटमध्ये नमवित आपले विंबल्डन अजिंक्यपद कायम राखले.

या संपूर्ण समन्यात सर्बीयन स्टार जोकोविचला कर्लोसने संधीच दिली नाही. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या कर्लोसने पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचची सर्विस पहिल्या आणि पकवीं गेममध्ये भेदली आणि दोन्ही सेट खिशात घाटल. जोरदार सर्विस आणि आक्रमक फटक्यांच्या जोरावर कर्लोसने अडखळणाऱ्या जोकविचला बांधून ठेवले.

तिसऱ्या सेटमध्ये मात्र जोकोविचने जोरदार लढत दिली. ४-४ आशा बरोबरीपर्यंत दोघेही आपली संपूर्ण ताकद लावून खेळत होते. मात्र नवव्या गेममध्ये अल्कारेजने जोकोविचची सर्विस भेदली आणि सामन्यावर नियंत्रण मिळविले. दहाव्या गेममध्ये अल्कारेजने ४०-० अशी आघाडीही घेतली; मात्र त्याला मिळालेले तब्बल ३ मॅच पॉईंट्स वाचवता आले नाहीत. जोकोविचने आपल्या संपूर्ण अनुभवाचा वापर करीत अल्कारेजची ही सर्विस भेदली आणि बरोबरी साधली. नंतर दोघांनीही आपापल्या सर्विस रखल्याने हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये मात्र अल्कारेजला पुनः आपल्या खेळातील लय सापडली आणि त्याने हा टायब्रेकर, सेट आणि सामना जिंकत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

या पराभवामुळे जोकोविच मार्गरेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम अजिंक्यपदांचा आणि रोजर फेडररच्या आठ विंबल्डन अजिंक्यपदांचा विक्रम गाठू शकला नाही. अल्कारेजने मात्र या विजयामुळे फ्रेंच ओपेन (रोलॉगेरॉ) आणि विंबल्डन एकाच वर्षी जिंकण्याची करामत करणाऱ्या रॉड लेव्हर, बियॉन बोर्ग, राफा नदळ, रॉजर फेडेरर आणि जोकोविच यांच्या पंक्तीत स्थान पटकावले.

साडे अठ्ठावीस कोटींचे बक्षीस!

समन्यानंतर बोलताना अल्कारेजने यावर अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, की मि अद्याप स्वत:ला चॅम्पियन समजत नाही. त्यांच्यासारखा तर नाहीच नाही. मि माझा मार्ग शोधत राहणार आहे. आणखी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे. याअजिंक्यपदाने अल्कारेजला २.७ मिलियन पाऊंडनी (३४ लाख २७ हजार ३९६ अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच २८ कोटी ३५ लाख भारतीय रुपये) श्रीमंत केले. जोकोविचला १४ लाख पाऊंड (१४ कोटी ७० लाख रुपये) एवढी बक्षीस रक्कम मिळाली.

See also  कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने ब्रॉन्झ जिंकले!