सात्विक-चिराग जोडीही दुसऱ्या फेरीत; चीनला दुसरे सुवर्ण

Paris Olympics |

Paris Olympics |
Paris Olympics |

Paris Olympics | बॅडमिंटन मधील भारताची स्टार जोडी असलेल्या सात्विक साइराज आणि चिराग शेट्टी जोडीने यजमान फ्रान्स च्या लुकास आणि रोंनान या जोडीला सरळ दोन गेममध्ये नामवित दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.

सात्विक-चिराग जोडीने असंन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खलचे प्रदर्शन करताना लुकास-रोंनान जोडीला संधीच मिळू दिली नाही.  दोन्ही गेममध्ये या जोडीने फ्रान्सच्या जोडीला कधीच आघाडी घेऊ दिली नाही. दोन्ही गेम २१-१७, २१-१४ असे आरामात जिंकत त्यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला.

चीनला दुसरे सुवर्ण Paris Olympics | 

शूटिंगमधील पहिल्या सुवर्ण पदकापाठोपाठ चीनने ३ मिटर्स सिनक्रोनाईज डायव्हिंग मध्येही सुवर्णपदकाची कमाई केली. चांग यानी आणि चॅन यीवेन या जोडीने आपल्या देशासाठी हे दुसरे सुवर्णपदक जिंकले.

स्पर्धा सुरू होताच चीनी समर्थकांनी टाळ्या आणि शिट्टयांनी परिसर दणाणून सोडला. या गदारोळात चीनी जोडीचे लक्ष्य भरकटले आणि त्या वेळेच्या आधी काशाबशा बोर्डवर पोहोचल्या. सारा बेकहन आणि कॅसीडी कुक या अमेररीकण जोडीने रौप्य तर ब्रिटनच्या यास्मिन हार्पर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. या इव्हेंटमध्ये आठही सुंवर्णपदके जिंकण्याचे चीनचे लक्ष्य आहे.

हेही वाचा 

लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत; हरमीतनेही मारली बाजी

भारतीय खेळाडू करताहेत जग पादाक्रांत!

शानदार समारंभाने पॅरिस ऑलिंपिक्सला सुरुवात

See also  ऑस्ट्रेलियाच्या एडबन-पिअर्स जोडीला टेनिस दुहेरीचे सुवर्ण