हॉकी : भारताची विजयी सलामी

Paris Olympics |

Paris Olympics Hockey |
Paris Olympics Hockey |

Paris Olympics | शेवटच्या मिनीटापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या समन्यात भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतील आपल्या पहिल्या समन्यात न्यूझीलंडवर ३-२ असा सनसनाटी विजय मिळवीत विजयी सलामी दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक चढाया सुरू केल्या; मात्र न्यूझीलंडच्या बचाव फळीने भारतीय आक्रमणे परतवून लावली. आठव्याच मिनिटाला न्यूझीलंडच्या आघाडीच्या फळीने भारतीय गोळपोस्टवर प्रतिहल्ला चढवित आपणही कमी नसल्याचेच दाखवून दिले. यावेळी त्यांना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवीत सॅम लेण याने गोल करीत न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली.

पहिल्या क्वार्टर मध्ये पिछाडी Paris Olympics |

पहिल्या क्वार्टरमध्ये ०-१ आशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने मग आपली आक्रमणाची धार आणखी वढवली. २४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताच्या मनदीपसिंग याने शानदार गोल करीत भारताला बरोबरी साधून दिली. हाफ टाइम नंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडच्या गोलपोस्टवर वारंवार हल्ले चढविले. ३४ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत विवेक सागर प्रसादने अप्रतिम गोल नोंदवीत भारताला आघाडी मिळवून दिली.

न्यूझीलंडची बरोबरी Paris Olympics |

भारताच्या वारंवार होत असलेल्या आक्रमणाला रोखण्यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू पुरेपूर प्रयत्न करीत होते. त्यांनी प्रति आक्रमणांचा धडाका लावला. त्यात ५३ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. सिमॉन चिल्ड याने या संधीचा फायदा घेत न्यूझीलंडला बरोबरी साधून दिली.

यानंतरचे सात मिनिटे सामना रोमांचक अवस्थेत गेला. भारतीयांचे आक्रमण आणि न्यूझीलंडचे प्रतिआक्रमण यावर सामना कोणत्या बाजूने झुकणार हे कळत नव्हते. मात्र सामना संपण्यासाठी अवघ्या एका मिनिटंचा अवधी राहिलेला असताना भारताला पेनल्टी कॉर्नर आणि मग पेनल्टी स्ट्रोक मिळाला त्यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने शानदार गोल करत भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले.

See also  शानदार समारंभाने पॅरिस ऑलिंपिक्सला सुरुवात