Paris Olympics | भारताच्या चिराग शेट्टी जणी स्वस्तिकराज रेनकिरेड्डी या जोडीने इंडोनेशियाच्या अरडियान्तो आणि अल्फियान या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या जोडीला २१-१३, २१-१३ असे सरळ सेट्समध्ये पराभूत करीत बॅडमिंटनमधील पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले.
जर्मनीच्या लॅम्सफसने गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने चिराग-सात्विक यांचा मार्क्स लॅम्सफस आणि मर्विन सिडल या जोडीविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताच्या या बॅडमिंटन पटूंना इंडोनेशियाच्या अरडियान्तो-अल्फियान या पूर्वीच्या अग्र मानांकितआणि सध्याच्या सातव्या मानांकित जोडिविरुद्ध सामना खेळावा लागला.
गटात अव्वल स्थान Paris Olympics |
पदकाच्या दिशेने कुच करण्यासाठी भारतीय जोडीला या प्राथमिक गटातील शेवटच्या समन्यात आपल्या गटात पहिलं क्रमांक मिळविण्यासाठी विजय मिळविणे आवश्यक होते. त्यात भारतीय जोडी कुठेही कमी पडली नाही. २०२३ च्या कोरियन ओपेनमध्ये भारतीय जोडीने याच दोघांना पराभूत करीत अजिंक्यपद पटकावले होते. त्याच खेळाची पुरावृत्ती करीत ‘सॅट-ची’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जोडीने सामना एकतर्फी जिंकला.
क्रिकेटपेक्षा फुटबॉल बक्षीस रकमेत भारी!
सोमवारी जर्मनीच्या जोडीने माघार घेतल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केलेल्या चिराग-सात्विकला हा सामना औपचारिक होता. मातर या सामन्यातील विजयाने आपल्या गटातील पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविताना भारतीय जोडीने कमाल केली. संपूर्ण समन्यात वर्चस्व गाजवतान सात्विक-चिरागने इंडोनेशियन जोडीला डोके वार काढू दिले नाही.
हेही वाचा