Paris Olympics | भारतीय बॅडमिंटन संघातील एकमेव आशा उरलेल्या लक्ष्य सेनने भरताच्याच एच. एस. प्रणॉय याचा सलग दोन गेममध्ये पराभव करीत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
आक्रमक सुरुवात Paris Olympics |
सुरुवातीपासूनच आक्रमक खेळणाऱ्या लक्ष्यने पहिल्या गेममध्ये सलग गुणांची कमाई करताना हा गेम २१-१२ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्येही प्रणॉयला लक्ष्यच्या आक्रमक खेळीला प्रत्युत्तर देता आले नाही. त्याने एका मागोमाग एक गुण घेत १४-३ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर १६-४ आणि शेवटी २१-६ असा गेम जिंकत लक्ष्यने हा सामना जिंकला.
शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लक्षयचा सामना चीनच्या चोऊ टियेन चेन याच्याशी होईल.