Paris Olympics | पॅरिस ऑलिंपिकच्या पहिल्या दिवशी हमखास पदक मिळणार अशी खात्री असलेल्या नेमबाजीमध्ये भारताच्या सारबजित सिंग आणि अर्जुन सिंग चिमा यांनी निराश केले. १० मिटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात त्यांना अपयश आल्याने भारतीय चमूत पसरलेली नाराजी महिलांच्या १० मिटर्स एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकर हिने दूर केली.
चीनने जिंकले पहिले गोल्ड; भारताची निराशा
२२ वर्षीय भाकरने अत्यंत आत्मविश्वासाने स्पर्धेला सुरुवात केली आणि पात्रता फेरीत ५८० गुण मिळवीत तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीने तिचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. तीची सहकारी हृथं सांगवान हिल मात्र अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. ती ५७३ गुणांसह १५ व्या स्थानी राहिली. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता अंतिम फेरी होणार आहे.
२० वर्षात प्रथमच अंतिम फेरी Paris Olympics |
गेल्या २० वर्षात वैयक्तिक स्पर्धेत ऑलिंपिक स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारी मनू पहिल खेळाडू ठरली आहे. यापूर्वी २००४ साली एथेन्स येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सुमा शिरूर हिने १० मिटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठलि होती. तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिंपिक सपपअर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे नाराज झालेल्या मानूने या स्पर्धेत आपल्या पुऱ्या तकदीनिशी खेळ केला.
हेही वाचा
गुडघ्याचे ‘एसीएल लिगामेंट’ फटल्यास काय?