‘टी २०’ आशिया करंडक श्रीलंकेने जिंकला; भारत पराभूत

women's Asia Cup |

women's Asia Cup |
women's Asia Cup |

women’s Asia Cup | श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू (६१) आणि हर्षिता समरविक्रमा (नाबाद ६९) यांनी तगडया भारतीय महिला क्रिकेट संघाला आठ गडी राखून मत देत पहिल्यांदाच ‘टी २०’ आशिया कारंडकावर आपले नाव कोरले. याआधी पाच वेळ श्रीलंकन महिलांनी आशिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती; मात्र प्रत्येक वेळी त्यांना निरशेचा सामना करावा लागला होता. अखेर रविवारी त्यांनी आशिया करंडक जिंकला.

स्मृतीची फटकेबाजी women’s Asia Cup |

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची सरुवात नेहमीप्रमाणे चांगली झाली. मात्र ४४ धावा झाल्या असताना शेफाली वर्मा १६ धावांवर बाद झाली. त्यानंतर आलेली उमा चेत्रीही फारशी चांगली कामगिरी करू शकली नाही, टी ९ धावांवर बाद झाली. कर्णधार हरमनही फारशी चमक दाखवू शकली नाही. तिच्या नंतर आलेल्या जेमीमा रॉड्रिग्जने स्मृतील चांगली साथ दिली. मात्र ती २९ धावांवर असताना एक धोकादायक धाव घेताना धावबाद झाली. एका बाजूने फटकेबाजी करीत अर्धशतक नोंदविणारी स्मृति मानधनाही मग ६० धाववर तंबूत परतली. अखेरच्या षटकांमध्ये ऋचा घोष हिने फटकेबाजी करीत भारताचा डाव १६५ धावांपर्यंत नेला.

खराब सुरुवातीनंतर धमाका women’s Asia Cup |

विजयासाठी आवश्यक असलेल्या १६६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. आघाडीवीर विशमी गुणरत्ने केवळ १ धाव करून तंबूत परतली. त्यावेळी श्रीलंकेच्या केवळ ७ धावा झाल्या होत्या. विशमी बाद झाल्यानंतर मात्र श्रीलंकेची कर्णधार चमरी अट्टापट्टूने सामन्याची सूत्रे स्वत:च्या हाती घेत भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरू केली. संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला गोलंदाजांना आज सूर सापडलाच नाही. दुसऱ्या गड्यासाठी चमारी आणि हर्षिता समरविक्रमा या जोडीने ८७ धावांची भागीदारी करीत संघाला विजयाच्या समीप आणून सोडले. संघाची धावसंख्या ९४ झाली असताना चमारी अट्टापट्टू बाद झाली.

गाचाळ क्षेत्ररक्षण women’s Asia Cup |

भारतीय महिला यानंतरतरी सामन्यात पुनरागमन करतील असे वाटत असतानाच हर्षिता समरविक्रमाने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्यातच भारतीय क्षेत्ररक्षकांनीही खराब क्षेत्ररक्षण करीत तिला अप्रत्यक्ष साथ दिली. हरमनप्रीतसह अनेक खेळाडूंनी सोपे झेल सोडणे श्रीलंकेच्या पथ्यावर पडले. मग समरविक्रमा आणि कविशा दिलहारी यांनी १८.४ षटकांतच संघाला अजिंक्यपद मिळवून देणारी कामगिरी केली. हर्षिता समरविक्रमा सामन्याची तर चमारी अट्टापट्टू मालिकेची मानकरी ठरली.

See also  सूर्या चमकला; श्रीलंकेला ४३ धावांनी नामविले

धावफलक : भारत : शेफाली वर्मा पायचीत गो. कविशा दिलहारी १६, स्मृति मानधना झे. चमारी अट्टापट्टू गो. कविशा दिलहारी ६०, उमा चेत्री पायचीत गो. चमारी अट्टापट्टू ९, हरमनप्रीत कौर झे. निलक्षी डिसीलव्हा गो. सचीनी निसानसाला ११, जेमीमा रॉडरीग्ज धावबाद २९, ऋचा घोष झे. अनुष्का संजीवनी गो. उदेशिका प्रबोधिनी ३०, पूजा वस्त्रकार नाबाद ५, राधा यादव नाबाद १, अवांतर ४, एकूण २० षटकांत ६ बाद १६५. गडी बाद होण्याचा क्रम : १/४४, २/५८, ३/८७, ४/१२८, ५/१३३, ६/१६४. गोलंदाजी : प्रियदर्शिनी ४-०-३१-०, प्रबोधिनी ३-०-२७-१, सुगंधिका कुमारी ४-०-२३-०, कविशा दिलहारी ४-०-३६-२, सचीनी निसानसाला २-०-२०-१, चमारी अट्टापट्टू ३-०-२८-१.

श्रीलंका : विशमी गुणरत्ने धावबाद १, चमारी अट्टापट्टू तरी. गो. दीप्ती शर्मा ६१, हर्षिता समरविक्रमा नाबाद ६९, कविशा दिलहारी नाबाद ३०, अवांतर १०, एकूण २ बाद १६७. गडी बाद होण्याचा क्रम १/७, २/९४. गोलंदाजी : रेणुका सिंग ३-०-२३-०, पूजा वस्त्रकार ३.४-०-२९.०, दीप्ती शर्मा ४-०-३०-१, तनुजा कंवर ४-०-३४-०, राधा यादव ४-०-४७-०.

हेही वाचा

भारताला पहिले पदक; मनू भाकरने जिंकले कांस्य!

पी. व्ही. सिंधूची ऑलिंपिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात; प्रिती पवारही दुसऱ्या फेरीत

थॅंक यू कपिल; थॅंक यू टीम इंडिया!