Paris Olympics | अत्यंत अटीतटीच्या लंढतीमध्ये कोल्हापूरच्या मारठमोळ्या स्वप्नील कुसळेने ५० मिटर्स रायफल ३ पोझिशन्स प्रकारात भारताला कांस्य पदक पटकावले. त्याने अंतिम फेरीत ४५१.४ गुण मिळवीत ही कामगिरी केली.
त्याच्या या कामिगरीमुळे मनू भाकर नंतर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली असून, आता भारताच्या खात्यात तीन कांस्य पदके जमा झाली आहेत.
निलींग प्रकारात १५३.३ गुण Paris Olympics |
स्वप्नीलने नीलींग प्रकारात १५३.३ गुण घेतले. तो या फेरीत सहाव्या स्थानी राहीला. निलींगनंतर प्रोन प्रकारात आपली कामगिरी सुधारत स्वप्नीलने आपल्या एकूण गुणांची संख्या ३१०.१ वर नेत पाचव्या स्थानावर उडी घेतली. त्यानंतर त्याने शेवटच्या स्टँडिंग प्रकारात सुरुवातीपासून उत्तम कामगिरी साधत एक एक पाऊल पुढे टाकले.
तिसऱ्या स्थानी झेप Paris Olympics |
स्टँडिंग प्रकारात पहिल्या सेरीजमध्ये ९.५, १०.७, १०.३, १०.६ आणि १० गुण नोंदवीत चौथ्या स्थानी झेप घेतली. दुसऱ्या सेरीजमध्ये १०.६, १०.३, ९.१, १०.१ आणि १०.३ गुण मिळवीत ाआणखी एक उडी घेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. यावेळी सुरू झालेल्या एलिमीनेशन राऊंडमध्ये सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे खेळाडू बाहेर पडले. स्वप्नीलने मात्र आपले तिसरे स्थान कायम ठेवले.
या स्पर्धेतील आपला ४२ वा शॉट मारताना स्वप्नीलला ९.४ गुणांचीच कमाई करता आली; मात्र त्याचे तिसरे स्थान आबाधित राहिले. स्वप्नीलने आपल्या शेवटच्या शॉटवर ९.९ गुणांची कमाई केली आणि भारताला आणखी एका पदकाची भेट दिली. चीनच्या वाय. के. लियू याने ४६३.६ गुणांसह सुवर्ण तर एस. कुलिश याने ४६१.३ गुणांसह रौप्य पदक पटकावले.