Paris Olympics Hockey | ब गटातील आपल्या अखेरच्या साखळी समन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाला 3-2 असे नमवित ५२ वर्षांनंतर ऑलिंपिक स्पर्धेत त्यांच्याविरुद्ध विजयाची नोंद केली. भारतीय संघाने या पूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठलि असली तरी, ऑस्ट्रेलियावरील या विजयाने भारतीय खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचवले असणार यात शंका नाही.
अंकिता भकत-धीरज बोम्मादेवरा जोडीचे पदक हुकले!
१३ व्या आणि ३२ व्या मिनिटाला गोल नोंदविणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या दोन गोलमुळे त्याने या ऑलिंपिक स्पर्धेत नोंदविलेल्या गोलची संख्या ६ झाली आहे.
सामन्याच्या १२ व्या मिनिटाला अभिषेकने गोल करीत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच कर्णधार हरमनप्रीतने ही आघाडी २-० अशी केली. सामन्याच्या २५ या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या टॉम क्रेगने ही आघाडी कमी केली. हरमनप्रीतने ३२ व्या मिनिटाला आणखी एक गोल करीत भारताची आघाडी ३-१ अशी वाढवली. अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय गोळपोस्टवर आक्रमणे केली. त्यात ५५ व्या मिनिटाला ब्लेक गोव्हर्स याने गोल करण्यात यश मिळविले. मात्र त्यानंतर भारतीय बचाव फळीने त्यांना संधि दिली नाही.
लक्ष्य सेनने इतिहास घडवला; उपांत्यफेरीत धडक!