हॉकी : भारताला आणखी एक कांस्यपदक!

Paris Olympics Hockey |

Paris Olympics Hockey |
Paris Olympics Hockey |

Paris Olympics Hockey | भारतीय हॉकी संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करीत सलग दुसऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक पटकविण्याची किमया साधली. भारताच्या या विजयाचे शिल्पकार नेहमीप्रमाणे कर्णधार हरमनप्रीत आणि गोल रक्षक श्रीजेश हेच ठरले.

जोकोविचने सुवर्ण पदक जिंकले! विंबल्डनमधील पराभवाची परतफेड!

उपांत्य फेरीत अटीतटीच्या लढतीत पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय संघाने कांस्य पदकाच्या लढतीसाठी आपली संपूर्ण ताकद राखून ठेवली. या सामन्यानंतर निवृत्त होत असलेला भारतीय संघाचा ज्येष्ठ खेळाडू आणि गोलरक्षक श्रीजेश याला कांस्य पदकाची कमाई करूनच निरोप द्यायचा पक्का इरादा भारतीय संघाने केला होता. आणि तो त्यांनी पूर्णही  केला.

‘पी हळद हो गोरी’ असे होत नसते…

दरम्यान सामन्याची सुरुवात भारतीय खेळाडूंनी अतिशय आक्रमक पद्धतीने केली असली तरी १८ व्या इणीतला मिळालेल्या पेन्लटी स्ट्रोकच्या जोरावर स्पेनचा कर्णधार मार्क मीराल्लेस याने गोल नोंदवीत १-० अशी आघाडी घेतली. यावेळी भारतीय हॉकी प्रेमींच्या पोटात गोल उठला. मात्र भारतीय संघाने आपला आक्रमक पवित्रा सोडला नाही आणि स्पेनच्या गोलपोस्टवर धडक मारण्याचा सपाटा सरूच ठेवला.

हरमनप्रीतचा धमाका Paris Olympics Hockey |

दरम्यान ३० आणि ३३ व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेन्लटी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंग याने शानदार गोल नोंदीवत प्रथम बरोबरी आणि नंतर आघाडी मिळवून दिली. ब गटात साखळी फेरीत स्पेनला एकदा पराभूत केलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास या समन्यात प्रचंड वाढलेला होता. त्यांनी आघाडी मिळविल्यानंतर स्पेनला एकही संधी मिळू दिली नाही.

स्पेनने चक्क गोलरक्षकाला बाहेर पाठवले Paris Olympics Hockey |

शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय संघाने आपलाबचाव अप्रतिम करताना स्पेनच्या अनेक आक्रमणांना परतवून लावले. ५३ व्या मिनिटाला भारताच्या सुखजित सिंगला ग्रीन कार्ड दाखविण्यात आले. भारतीय संघ १० जणांसाह खेळला. मात्र स्पेनचे खेळाडू काही करू शकले नाहीत. शेवटी सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला स्पेनने आपल्या गोलरक्षकाला मैदनाबाहेर पाठवून आणखी एका स्ट्रायकरला मैदानात उतरवले, मात्र भारतीय बच अलिने स्पेनची आक्रमणे थोपवून धरताना त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही.

See also  अंकिता भकत-धीरज बोम्मादेवरा जोडीचे पदक हुकले!

मन:शक्तीचे बळ वाढवणे हीच यशाची पहिली पायरी

एका बाजूने भारतीय खेळाडू उत्तम बचावाच्या टेक्निककचे प्रदर्शन करत होते तर, ५९ व्या मिनिटाला स्पेनने २ पेनलटी कॉर्नर मिळवीत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करीत होते. ४४ सेकंद राहिलेले असतानाही त्यांना पेनलटी कॉर्नर मिळाला मात्र ते गोल नोंदवू शकले नाहीत. शेवटच्या क्षणी त्यांनी व्हिडिओ रेफरल घेतला खरा पण त्यांना काही संधी करता आले नाही आणि भारताने सामना २-१ असा जिंकत कांस्य पदकला गवसणी घातली.

सलग दोन ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने आपला ज्येष्ठ खेळाडू आणि गोलरक्षक श्रीजेश यला सन्मानाने निरोप दिल.